Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Gokul Milk Price Difference : दूध उत्पादकांसाठी गोकुळकडून ११७ कोटींचा दर फरक जमा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
महाराष्ट्र

Gokul Milk Price Difference : दूध उत्पादकांसाठी गोकुळकडून ११७ कोटींचा दर फरक जमा; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

Gokul Milk Price Difference
23
Gokul Milk Price Difference : गोकुळ दूध संघाने दूध उत्पादकांच्या खात्यावर ११७ कोटी रुपयांचा दूध दर फरक जमा केला आहे. राजकीय वाद आणि संघाच्या कारभारावर चर्चा सुरू असतानाच हा निर्णय महत्त्वाचा ठरत आहे. कोणत्या कालावधीचा हा दर फरक आहे, उत्पादकांना किती रक्कम मिळणार आणि या निर्णयाचा किती शेतकऱ्यांना फायदा होणार? जाणून घ्या सविस्तर.

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळमध्ये अध्यक्षपदावरून समविचारी आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. एकीकडे राजकीय वातावरण तापले असताना दुसरीकडे गोकुळने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील अंतिम दूध दर फरकापोटी गोकुळने तब्बल ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपयांची रक्कम संबंधित दूध संस्थांच्या बँक खात्यांवर जमा केली आहे. या निर्णयाचा जिल्ह्यातील सुमारे ५ लाख शेतकरी कुटुंबांना लाभ होणार आहे. (Gokul 117 Crore)

म्हशीच्या आणि गायीच्या दुधाला किती दर फरक?

गोकुळकडून दूध उत्पादकांना म्हशीच्या आणि गायीच्या दुधासाठी स्वतंत्र दर फरक मंजूर करण्यात आला आहे. म्हशीच्या दुधासाठी सरासरी प्रतिलिटर २ रुपये २५ पैसे, म्हणजेच ३.८१ टक्के दर फरक देण्यात आला आहे. (Milk Producers Maharashtra) यासाठी एकूण ६३ कोटी १२ लाख ११ हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. तर गायीच्या दुधासाठी सरासरी प्रतिलिटर १ रुपया २५ पैसे, म्हणजेच ३.५१ टक्के दर फरक देण्यात आला आहे. यासाठी ३९ कोटी १३ लाख ९६ हजार रुपये देण्यात आले आहेत. त्यामुळे दूध उत्पादकांना सणासुदीच्या काळात आर्थिक दिलासा मिळणार आहे. (Gokul Milk Price Difference)

व्याज आणि डिबेंचरमधूनही अतिरिक्त लाभ

दूध दर फरकासोबतच व्याज आणि डिबेंचरच्या माध्यमातूनही दूध संस्थांना रक्कम देण्यात आली आहे. दर फरकावरील ६ टक्के व्याजापोटी ३ कोटी ४२ लाख ४० हजार रुपये, तर ६.५० टक्के डिबेंचर व्याजापोटी ११ कोटी ७३ लाख ५९ हजार रुपये जोडण्यात आले आहेत. (Gokul Milk Price) याशिवाय प्राथमिक दूध संस्थांच्या डिबेंचर खात्यांवर प्रतिलिटर सरासरी २० पैसे याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली आहे. अशा प्रकारे सर्व लाभ मिळून एकूण ११७ कोटी ४२ लाख ६ हजार रुपये स्वतंत्र दूध बिलाद्वारे संबंधित संस्थांच्या बँक खात्यांवर वर्ग करण्यात आले आहेत. (Gokul Milk Union)

राजकीय वादात दूध उत्पादकांना दिलासा

गोकुळमधील अध्यक्षपदावरून राजकीय संघर्ष सुरू असतानाच दूध उत्पादकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरला आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या या आर्थिक लाभामुळे दूध उत्पादक शेतकरी कुटुंबांना दिलासा मिळणार आहे. त्यामुळे गोकुळमधील राजकीय घडामोडींच्या चर्चेसोबतच दूध दर फरकाच्या या निर्णयाचीही जिल्ह्यात चर्चा सुरू आहे.  (LS Marathi)

 

Gokul Election 2026: गोकुळ दूध संघाची निवडणूक अंतिम टप्प्यात; महायुती विरुद्ध समविचारी आघाडी, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts