अमोल धर्माधिकारी
- पुण्यातील कोथरूड परिसरातून सात लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून ४३ वर्षीय व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले.
अपहरणकर्ते व्यावसायिकाला घेऊन नवी मुंबईच्या दिशेने जात असताना अलंकार पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला.
खालापूर टोलनाक्याजवळ संशयितांची गाडी अडवून पोलिसांनी अपहृत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली.
Pune Crime : पुण्यातील कोथरूड परिसरातून सात लाखांच्या कर्जाच्या वादातून व्यावसायिकाचे अपहरण करण्यात आले. अलंकार पोलिसांनी नवी मुंबईपर्यंत पाठलाग करून व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली.
खालापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी करून अडवली आरोपींची गाडी; एका आरोपीला अटक, तीन साथीदार फरार. पुण्यातील कोथरूड परिसरात सात लाख रुपयांच्या कर्जाच्या वादातून एका ४३ वर्षीय व्यावसायिकाचे चार जणांनी स्कॉर्पिओ गाडीतून अपहरण केल्याची धक्कादायक घटना घडली. मात्र, अलंकार पोलिसांनी प्रसंगावधान राखत कोथरूड ते नवी मुंबई असा थरारक पाठलाग करून अपहृत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. याप्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याचे तीन साथीदार फरार झाले आहेत. (Pune Kidnapping Case)
केदार जयंत वांगीकर (वय ४३, रा. वारजे माळवाडी, पुणे) असे अपहरण झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. तर समीर गुलाब शेख असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Kothrud Crime)
टोलनाक्याचा अडथळा तोडून आरोपींचा पळण्याचा प्रयत्न
अपहरणाची माहिती मिळताच अलंकार पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींची स्कॉर्पिओ गाडी कर्वे रोड, चांदणी चौकमार्गे मुंबईच्या दिशेने जात असल्याचे समजताच पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण, रायगड, नवी मुंबई आणि महामार्ग पोलिसांना सतर्क करण्यात आले. (Navi Mumbai Police Chase)
पोलिसांनी आरोपींचा माग काढत पाठलाग सुरू केला. दरम्यान, खालापूर टोलनाक्याजवळ वाहतूक कोंडी करून आरोपींची गाडी अडवण्यात आली. यावेळी आरोपींनी टोलनाक्याचा अडथळा तोडून पळून जाण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे. (Businessman Kidnapping)
मात्र, पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवत अपहृत व्यावसायिकाची सुखरूप सुटका केली. या कारवाईत समीर गुलाब शेख याला अटक करण्यात आली असून, त्याचे अन्य तीन साथीदार फरार आहेत. पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरू आहे.









