Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • गाडीला कट मारला अन् थेट कोयत्याने हल्ला! 700 टाके, हाताला गंभीर दुखापत!
गुन्हा

गाडीला कट मारला अन् थेट कोयत्याने हल्ला! 700 टाके, हाताला गंभीर दुखापत!

Rajgurunagar Koyta Attack
3

Rajgurunagar Koyta Attack: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. केवळ गाडीला कट मारल्याच्या क्षुल्लक कारणावरून तीन अल्पवयीन मुलांनी एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून जीवघेणा हल्ला केला. या भीषण हल्ल्यात शिवम करमारे हा तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके पडले आहेत. या घटनेने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

राजगुरुनगरमध्ये कोयत्याने तरुणावर जीवघेणा हल्ला! (Rajgurunagar Koyta Attack)

पुण्यासह ग्रामीण भागात कोयता गँगची दहशत थांबण्याचं नाव घेत नाहीये. राजगुरुनगर शहरात भरदिवसा घडलेल्या या घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत. शिवम करमारे या तरुणाचा केवळ गाडीला कट मारण्यावरून काही मुलांशी वाद झाला होता. या किरकोळ वादाचा राग मनात धरून तीन अल्पवयीन मुलांनी धारदार कोयत्याने शिवमवर हल्ला चढवला.

हेही वाचा : पुण्याचे नाव बदलणार? ‘फुलेनगर’ करण्याची जोरदार मागणी; महात्मा फुलेंना भारतरत्न द्या!

तरुणाच्या डोक्यावर, पाठीवर आणि हातावर वार (Koyta Gang Pune)

डोक्यात, पाठीवर आणि हातावर सपासप वार करण्यात आले. या हल्ल्यात शिवमची तीन बोटे जागीच तुटली असून त्याचा एक हात कायमचा निकामी झाल्याची माहिती समोर येत आहे. गंभीर रक्तबंबाळ अवस्थेत शिवमला रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे त्याच्या शरीरावर तब्बल ७०० टाके घालावे लागले.
क्षुल्लक कारणावरून थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या या अल्पवयीन मुलांच्या वाढत्या हिंसक प्रवृत्तीमुळे पालकांसह पोलिसांची डोकेदुखी वाढली असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts