Pune Municipal Corporation : शनिवारवाडा परिसरातही महापालिकेची धडक कारवाई; अतिक्रमणविरोधी मोहिमेत हस्तक्षेप करणाऱ्यांना आयुक्त नवल किशोर राम यांचा इशारा,पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी अतिक्रमणविरोधी कारवाई सुरू आहे. कारवाई रोखण्यासाठी फोन करणाऱ्यांची नावे जाहीर केली जाणार का? जाणून घ्या सविस्तर.
पुणे शहरातील अतिक्रमणांविरोधात महानगरपालिकेने कारवाईचा धडाका कायम ठेवला आहे. सलग तिसऱ्या दिवशी महापालिकेकडून अतिक्रमण हटवण्याची मोहीम राबवण्यात येत असून, शनिवारवाडा परिसरातही कारवाई करण्यात आली. रस्त्यांवरील अतिक्रमण करून उभारण्यात आलेली घरे आणि दुकानांवर महापालिकेच्या पथकाने कारवाई केली. (Pune Action Mood)
या मोहिमेदरम्यान कारवाई थांबवण्यासाठी फोन करून दबाव आणणाऱ्यांची नावे जाहीर करण्याचा इशारा महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी दिल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अतिक्रमणविरोधी कारवाईबरोबरच त्यात हस्तक्षेप करणाऱ्यांच्या भूमिकेचीही चर्चा सुरू झाली आहे.पुण्यातील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आढावा आमचे प्रतिनिधी प्रथमेश तांबे यांनी घेतला आहे.
कारवाईचा धडाका किती दिवस सुरू राहणार?
शहरातील सार्वजनिक रस्ते आणि परिसर अतिक्रमणमुक्त करण्याच्या उद्देशाने महापालिकेकडून ही मोहीम राबवली जात आहे. शनिवारवाडा परिसरातील कारवाईमुळे या मोहिमेची व्याप्ती पुन्हा चर्चेत आली आहे. पुढील काळात कोणत्या भागांत कारवाई होणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Municipal Acton)
LS Marathi – महाराष्ट्रातील बातम्या, पर्यटन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससाठी आमच्यासोबत राहा.









