Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • 4 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर ठेवून रास्ता रोको; मुंबई-बंगळुरू महामार्ग सुमारे 5 तास बंद
Top News

4 वर्षीय चिमुकलीचा मृतदेह नवले पुलावर ठेवून रास्ता रोको; मुंबई-बंगळुरू महामार्ग सुमारे 5 तास बंद

Pune Bhor Crime Case:नसरापूर येथे ४ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या हृदयद्रावक अत्याचार आणि हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरवले आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरात संतापाची लाट पसरली आहे.

संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी पुण्याच्या नवले पुलावर चिमुकलीचा मृतदेह ठेवून तातडीने न्याय मिळावा यासाठी ” रास्ता रोको” आंदोलन केले. यामुळे मुंबई- बंगळुरू महामार्ग जवळजवळ ४ ते ५ तास ठप्प झाला, वाहनांच्या रांगा लांबच्या लांब लागल्या.

प्रकरणानुसार, मे रोजी नसरापूर येथे ६५ वर्षीय व्यक्तीने ४ वर्षीय मुलीला फूस लावून गोठ्यात नेले. तिथे मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली गेली. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक आणि [परिसरातील लोक संतप्त झाले.

हेही वाचा: नसरापूरच्या दुर्दैवी घटनेत शासनाचा पाठिंबा; विशेष सरकारी वकील नेमले, वाचा घटनेची सविस्तर माहिती

आंदोलनात सहभागी लोकांनी आरोपीला तातडीने फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली. तसेच, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दोन करून प्रकरणाची गंभीर दखल घेण्याचे आणि न्याय मिळवून देण्याचे आश्वासन द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. नातेवाईकांनी या कारवाईच्या ठोस आश्वासनाशिवाय चिमुकलीला अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारी पोलीस बंदोबस्त असून घटनास्थळी कायदेशीर नियंत्रण राखले जात आहे. प्रशासन आणि स्थानिक पोलीस प्रशासनाने प्रकरणाची तातडीने चौकशी करण्याचे अश्वासन दिले आहे, तर परिसरातील नागरिक देखील न्याय मिळविण्यासाठी सक्रिय आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts