Deepak Lodhi Death : कपड्यांवर रक्ताचे डाग, गुप्तांगावर भीषण जखम आणि खोलीत सापडलेला रक्ताने माखलेला ग्राइंडर, संत प्रेमानंद महाराजांच्या एका 24 वर्षांच्या शिष्याच्या खोलीत हे आढळलं आणि काही वेळातच त्याने छतावरून उडी मारून जीवन संपवलं, एक अध्यात्माचे केंद्र… जिथे रोज हजारो लोक शांततेच्या शोधात येतात. पण त्याच मथुरेच्या गुरु कृपा कुंज आश्रमात एका सकाळी असं काहीतरी घडतं, जे ऐकून पोलिसांच्याही अंगावर काटा येतो, प्रसिद्ध संत प्रेमानंद महाराजांचे २४ वर्षीय तरुण शिष्य दीपक लोधी ऊर्फ रसिक दुलारी शरण यांचा मृत्यू होतो.
वरून पाहिलं तर ही केवळ छतावरून उडी मारून केलेली आत्महत्या वाटते… पण जेव्हा पोलीस त्यांच्या खोलीत पाऊल ठेवतात, तेव्हा समोर आलेलं सत्य आत्महत्येच्या कल्पनेपलीकडचं आणि थरकाप उडवणारं असतं… ही आत्महत्या आहे की सुनियोजित घातपात? काय आहे मथुरेतील प्रेमानंद महाराजांच्या शिष्याच्या मृत्युचं गूढ ? कृपा कुंज आश्रमात नेमकं काय झालं ?
वृंदावनच्या आश्रमात नेमकं काय घडलं? ( Deepak Lodhi Death )
या संपूर्ण घटनेची सुरुवात होते मध्य प्रदेशातील जबलपूर येथून, जिथे दीपक लोधी नावाचा एक चोवीस वर्षांचा तरुण राहत होता. आजच्या आधुनिक जगातील मोहमायेतून मन उडाल्यानंतर दीपकने अध्यात्माचा मार्ग निवडला आणि तो मथुरेत संत प्रेमानंद महाराजांच्या ( Premanand Maharaj ) चरणी आला. प्रेमानंद महाराजांचे विचार आणि त्यांची भक्ती पाहून प्रभावित झालेल्या दीपकने दोन वर्षांपूर्वी त्यांच्याकडून दीक्षा घेतली आणि तो संन्यासी बनून रसिक दुलारी शरण या नावाने आश्रमात राहू लागला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत चालले होते, तरुण वयात भक्तीच्या मार्गावर चालणाऱ्या दीपकच्या चेहऱ्यावर एक वेगळेच समाधान असायचे, असे त्याच्या ओळखीच्या लोकांचे म्हणणे होते. मात्र, शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास असं काहीतरी घडलं ज्याची कल्पना कोणी स्वप्नातही केली नव्हती.
२५ सप्टेंबर २०२६… सकाळी ठीक दहा वाजून पंचवीस मिनिटांनी दीपक लोधी त्यांच्या खोलीबाहेर येतात. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांनुसार, त्यांच्या अंगावरचे कपडे रक्ताने पूर्णपणे माखलेले होते, पण त्यांच्या चेहऱ्यावर किंवा चालण्यात कोणतीही घाई गडबड दिसत नव्हती. ते शांतपणे चालत तिसऱ्या मजल्यावरून चौथ्या मजल्यावरील छतावर जातात. छतावर गेल्यानंतर ते लगेच उडी मारत नाहीत, तर तिथे तब्बल अकरा मिनिटे घालवतात. त्यानंतर सकाळी दहा वाजून छत्तीस मिनिटांनी ते छतावरून खाली छलांग मारतात आणि त्यांचा जागीच मृत्यू होतो.
हेही वाचा : AI मुळे 1अब्ज लोकांचे जीव जाणार? बिल गेट्स यांचा धक्कादायक इशारा
मृत्यूपूर्वी CCTVमध्ये काय दिसलं?
या अकरा मिनिटांच्या कालावधीत आणि मृत्यूपूर्वी त्यांच्या खोलीत नक्की काय घडले होते, हाच या संपूर्ण केसचा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट आहे. पोलिसांनी जेव्हा दीपक यांच्या खोलीची झडती घेतली, तेव्हा तिथे रक्ताचा सडा पडलेला होता आणि बाजूलाच टाइल्स कापण्याचे इलेक्ट्रिक ग्राइंडर मशीन रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडले होते. शवविच्छेदन अहवालाने या केसमध्ये जी माहिती दिली, ती ऐकून फॉरेन्सिक तज्ज्ञही अवाक झाले. छतावरून उडी मारण्यापूर्वी दीपक यांच्या गुप्तांगावर ग्राइंडरने वार करून त्यांना गंभीर इजा करण्यात आली होती. गुप्तांग कापण्यात आले होते, वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, शरीराच्या अत्यंत संवेदनशील भागावर चालत्या ग्राइंडरने वार करणे म्हणजे असह्य आणि प्राणघातक वेदना सहन करण्यासारखे आहे. इतका भयानक वार केल्यानंतर कोणताही माणूस तात्काळ बेशुद्ध होऊ शकतो किंवा वेदनेने जागीच कोसळू शकतो.
पण दीपक यांनी तो वारच सहन केला नाही, तर ते त्याच अवस्थेत रक्ताने माखलेल्या कपड्यांमध्ये खोलीबाहेर आले, जिन्यावरून चालत चौथ्या मजल्याच्या छतावर गेले आणि तिथे अकरा मिनिटे उभे राहिले. यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. एक सामान्य मनुष्य स्वतःच्या हाताने स्वतःवर इतका अमानुष आणि वेदनादायी वार कसा करू शकतो, हा पहिला मोठा प्रश्न आहे. जर त्यांना जीवन संपवायचे होते, तर छतावरून उडी मारणे हा मार्ग पुरेसा होता, मग मृत्यूपूर्वी स्वतःला अशा प्रकारे छिन्नविच्छिन्न करण्याचे कारण काय होते.
कुटुंबीयांनी काय आरोप केले? ( Rasik Dulari Sharan Death )
या संपूर्ण गूढ प्रकरणात संशयाची सुई अधिक गडद होते जेव्हा दीपक यांच्या जबलपूर येथील कुटुंबीयांचे जबाब समोर येतात. दीपकच्या अचानक झालेल्या मृत्यूची बातमी ऐकून त्याचे कुटुंबीय मथुरेत पोहोचले आणि त्यांनी आश्रमाच्या व्यवस्थापनावर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप केले. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, दोन वर्षांपूर्वी जेव्हापासून दीपकने प्रेमानंद महाराजांकडून दीक्षा घेतली होती, तेव्हापासून आश्रमातील काही ठराविक लोकांकडून दीपकला त्याच्या कुटुंबापासून जाणीवपूर्वक लांब ठेवले जात होते. कुटुंबाने अनेकदा दीपकला भेटण्याचा प्रयत्न केला, पण आश्रमातील काही लोकांच्या दबावामुळे किंवा तिथल्या नियमांमुळे त्यांना दीपकशी नीट बोलू दिले जात नव्हते. कुटुंबाचा हा आरोप या प्रकरणाला एका वेगळ्याच गुन्हेगारी किंवा कटकारस्थानाच्या दिशेने घेऊन जातो. जर दीपक आश्रमात आनंदी होता आणि भक्तीत लीन होता, तर त्याला कुटुंबापासून तोडण्याचा प्रयत्न का केला जात होता. आश्रमाच्या बंद दाराआड असे काही चालले होते का, ज्याची माहिती बाहेर पडू नये म्हणून दीपकवर दबाव टाकला जात होता. की दीपकला अशा कोणत्याही गुप्त गोष्टीची माहिती मिळाली होती, जी उघड होण्याची भीती कोणा तिसऱ्याच व्यक्तीला होती. कुटुंबाच्या या आरोपांमुळे पोलिसांना आता केवळ आत्महत्येच्या कोनातून नाही, तर घातपात किंवा हत्येच्या कोनातूनही तपास करावा लागत आहे.
Deepak Lodhi Death : दुसरीकडे, जर पोलिसांच्या प्राथमिक अंदाजाप्रमाणे ही केवळ एक अंधश्रद्धेतून किंवा तांत्रिक उपासनेतून केलेली आत्महत्येची घटना मानली, तरीही अनेक गोष्टींचा उलगडा होणे बाकी आहे. काही प्रकरणांमध्ये असे दिसून आले आहे की, तीव्र मानसिक नैराश्यातून किंवा एखाद्या चुकीच्या अध्यात्मिक कल्पनेच्या प्रभावाखाली येून व्यक्ती स्वतःला वेदना देतात. परंतु, दीपक हा प्रेमानंद महाराजांसारख्या सात्विक आणि सरळ मार्गाने जाणाऱ्या संतांचा शिष्य होता, जिथे अशा कोणत्याही तांत्रिक किंवा हिंसक प्रकारांना थारा दिला जात नाही. मग दीपकच्या मनात असा कोणता विचार आला ज्याने त्याला स्वतःचेच शरीर कापण्यास प्रवृत्त केले. पोलीस सध्या दीपकचा मोबाईल फोन, त्याचे सोशल मीडिया अकाऊंट्स, शेवटचे कॉल्स आणि आश्रमातील इतर शिष्यांसोबत झालेले त्याचे चॅट्स अतिशय बारकाईने तपासत आहेत. मृत्यूपूर्वी त्याने कोणताही व्हिडिओ बनवला होता का किंवा कोणती सुसाईड नोट लिहिली होती का, याचाही शोध घेतला जात आहे. जर मोबाईल डेटा सुरक्षित मिळाला, तर कदाचित त्या अकरा मिनिटांच्या आधी त्याच्या मनात काय चालले होते याचा उलगडा होऊ शकेल. परंतु, जोपर्यंत फॉरेन्सिक लॅबचा अंतिम अहवाल आणि मोबाईल फॉरेन्सिकचा डेटा समोर येत नाही, तोपर्यंत या प्रकरणावरील रहस्य कायम राहणार आहे.
हेही वाचा : लोणीकंदमध्ये स्टोन क्रशरमध्ये 17 वर्षीय मुलाचा मृत्यू! अल्पवयीन कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
फॉरेन्सिक रिपोर्टमधून काय समोर येणार? ( Vrindavan Ashram Death )
या संपूर्ण प्रकरणात अनेक अनुत्तरीत आणि गंभीर सवाल संपूर्ण उभे राहतात, सर्वात मोठा आणि पहिला सवाल हा आहे की, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणारा दीपक हा स्वतःच्या इच्छेने छताकडे जात होता की तो कोणाच्या तरी मानसिक किंवा शारीरिक दबावाखाली होता. कोणताही माणूस स्वतःच्या गुप्तांगावर ग्राइंडरने वार करून इतक्या शांतपणे चालत वर कसा जाऊ शकतो, की त्याला अंमली पदार्थ किंवा इतर कोणत्याही औषधाचा डोस देऊन त्याचे शरीर बधीर करण्यात आले होते. दुसरा महत्त्वाचा सवाल आश्रमाच्या अंतर्गत सुरक्षेवर आणि तिथल्या वातावरणावर निर्माण होतो की, जर दीपकच्या खोलीत एवढी मोठी घटना घडत होती, मोठ्या प्रमाणावर रक्त सांडत होते, तर आजूबाजूला राहणाऱ्या इतर शिष्यांना किंवा सुरक्षा रक्षकांना याचा सुगावा कसा लागला नाही. तिसरा आणि सर्वात अस्वस्थ करणारा सवाल म्हणजे, कुटुंबाने केलेले आरोप जर खरे असतील, तर अध्यात्माच्या नावाखाली चालणाऱ्या या पवित्र आश्रमात दीपकला नेमका कोणापासून आणि का धोका होता. ही खरोखरच एका मानसिक नैराश्यातून किंवा अंधश्रद्धेतून गेलेल्या शिष्याची क्लेशदायक आत्महत्या आहे, की या पवित्र क्षेत्राच्या पाठीमागे लपलेल्या एखाद्या अमानुष गुन्हेगारी कारस्थानाचा हा एक भयानक बळी आहे, हे प्रश्न मथुरेच्या पोलिसांना आणि या प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या लाखो भाविकांना विचार करायला लावणारे आहेत.
या प्रश्नांची उत्तरं आता मथुरेच्या पोलिसांना आणि फॉरेन्सिक टीमला शोधायची आहेत. अंधश्रद्धा, मानसिक नैराश्य की एखादं भीषण गुन्हेगारी कारस्थान? या गूढ मृत्यूमागचं खरं सत्य काय असेल, असं तुम्हाला वाटतं?









