Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • अनुष्का-विराटने घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल
मनोरंजन

अनुष्का-विराटने घेतली प्रेमानंद महाराजांची भेट; व्हिडीओ झाला सोशल मीडियावर व्हायरल

Anushka Sharma and Virat Kohli meeting Premanand Maharaj, video goes viral on social media

Anushka Virat Premanand Maharaj meeting : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेटपटू विराट कोहली हे कपल त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे बऱ्याचदा चर्चेत असतात. आता सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओ मध्ये प्रेमानंद महाराज यांच्या मठात दोघेही जण आल्याचे दिसून आले आहे.

अभिनेत्री अनुष्का शर्मा मुलांच्या भविष्यासाठी परदेशात स्थायिक झाल्याचे सांगितले जाते. अनुष्का शर्मा फार क्वचित भारतात दिसते. मुक्तीची ती भारतात अली असून अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना प्रेमानंद महाराजांच्या मठात भेटीसाठी गेल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या भेटीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ते अनेकदा दर्शनासाठी मठात येत असतात. आता देखील पुन्हा एकदा त्यांचा मठात दर्शन घेतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांच्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या प्रेमानंद महाराज यांच्या मठातील व्हायरल व्हिडीओ मध्ये ते दोघेही जमिनीव हात जोडून बसलेले दिसत आहे. दोघांनी प्रेमानंद महाराज यांच्यासोबत भावनांशी जोडले जाण्याबाबत संवाद साधला. यावेळी अनुष्का आणि विराट या दोघांचे हावभाव टिपण्यात आले.

अनुष्का शर्मा झाली भावुक

वृंदावनचे प्रसिद्ध बाबा प्रेमानंद महाराजांच्या दर्शनाला अनुष्का शर्मा आणि विराट कोहली सातत्याने जात असतात. यावेळी दोघेही जण साधारण पोशाखात दिसत होते. अनुष्का शर्माने सिम्पल असा ड्रेस आणि त्यावर शाल परिधान केली होती. या व्हिडीओ मध्ये अनुष्का शर्मा भावुक झाल्याचे निदर्शनास आले. अनुष्का शर्मा यंदा बऱ्याच दिवसांनंतर भारतात दिसली. त्यामुळे असा अंदाज बांधण्यात आला होता कि, ती प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी याला भेटण्यासाठी भारतात आली. परंतु व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ते दोघेही दरवर्षी प्रमाणे याही वर्षी हिवाळ्यात प्रेमानंद महाराजांच्या मठात दर्शनासाठी आल्याचे स्पष्ट झाले.

काय होता मठातील संवाद

यावेळी प्रेमानंद महाराजांनी देवाशी जोडलेले राहण्याबाबत अनुष्का आणि विराटला सांगितले. त्यांचे बोलणे ऐकता अनुष्काच्या डोळ्यात अश्रू दिसू लागले. प्रेमानंद महाराजांचे बोलणे संपल्यानंतर अनुष्काने त्यांचा आशीर्वाद घेतला. “तुम्ही आमचे आहात महाराज आणि आम्ही तुमचे आहोत.” असे अनुष्का म्हणाली. मात्र, यावर महाराजांनी तिला सांगितले की, “आम्ही सर्व ईश्वराचे आहोत.” ही गोष्ट ऐकून जोडप्याने त्यांच्या मठातून निरोप घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts