Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिंदे मुख्यमंत्री फडणवीस अर्थमंत्री शाह उपपंतप्रधान दिल्लीत नेमकं शिजतंय काय?
राजकारण

शिंदे मुख्यमंत्री फडणवीस अर्थमंत्री शाह उपपंतप्रधान दिल्लीत नेमकं शिजतंय काय?

Devendra Fadnavis

Devendra Fadnavis : राज्यातील आणि देशातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलताना दिसत आहे…केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपपंतप्रधान होणार अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे…यातच कधी चर्चा सुरु होते की 2029 मध्ये मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असू शकतात….आता तर चर्चा सुरु आहे की, फडणवीस थेट केंद्रात जाणार आहे…त्यांच्याकडे केंद्रात थेट अर्थमंत्री पद दिल्या जाणार आहे..त्यामुळे राज्यात मुख्यमंत्री पद कुणाकडे देणार असा प्रश्न अनेकांना पडला असेल..तर राज्यात पुन्हा एकदा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होणार असल्याची चर्चा आहे…त्यामुळे खरंच अमित शाह उपपंतप्रधान, देवेंद्र फडणवीस केंद्रीय अर्थमंत्री आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बनणार आहेत का? या फक्त चर्चा आहेत की खरंच राजकारणात मोठा बदल होणार आहे? गेल्या काही दिवसांपासून अशा चर्चा का सुरु आहेत? फडणवीसांना आता केंद्रीय अर्थमंत्री बनवत थेट 2029 मध्ये पंतप्रधान बनवण्यात येणार आहे का?

Eknath Shinde : एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवत ठाकरे गटाचे 6 खासदार फोडले आहेत..अनेकांना प्रश्न पडला असेल की सध्या निवडणुका नाही, मग या खासदारांची गरज शिंदेंना का पडली….तर या खासदारांची गरज डी-लिमिटेशन बिलसाठी असल्याची माहिती आहे…भाजप लवकरच लोकसभेत पुन्हा एकदा डी-लिमिटेशन बिल मांडणार आहे…त्यामुळे बहुमताच्या आकड्यांची जुळवाजूळव सुरु असल्याची चर्चा आहे..एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे 6 खासदार फोडल्याने त्यांना भाजपकडून बक्षिस मिळणार असल्याची माहिती आहे…यातच केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती आहे..या मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांचा पत्ता कट होणार आहे..तर काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळणार आहे..त्यामुळे फडणवीस हे केंद्रात जाणार आणि थेट अर्थमंत्री होणार अशी चर्चा आहे..तर अमित शाहांनी पश्चिम बंगालमध्ये भाजपला सत्ता मिळवून दिल्याने त्यांचेही प्रमोशन होणार आहे..पण ते सध्या गृहमंत्री असल्याने त्यांच्यावरती फक्त आता एकच पद आहे ते म्हणजे पंतप्रधान…त्यांना लगेच तर पंतप्रधान बनवता येणार नाही, त्यामुळे त्यांना उपपंतप्रधान बनवण्यात येणार आहे, अशी चर्चा आहे..जर फडणवीस केंद्रात गेले तर राज्यातील मुख्यमंत्री पद रिकामे होईल..त्यामुळे या ठिकाणी मुख्यमंत्री पद एकनाथ शिंदेंना मिळणार अशी चर्चा आहे..

हेही वाचा : नवऱ्याला मारलं बाथरुमखाली पुरलं बाई 45 दिवसांनी सापडली नेटकरी म्हणतात पुरूष जात नष्ट होईल..!

Amit Shah : या संपूर्ण राष्ट्रीय समीकरणाचा सर्वात मोठा आणि थेट परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर होताना दिसत आहे… राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट दिल्लीत जातील…फडणवीस यांच्या प्रशासकीय अनुभवाचा, अभ्यासू वृत्तीचा आणि अर्थकारणावरील त्यांच्या पकडीचा वापर देशाच्या आर्थिक धोरणांना अधिक गती देण्यासाठी केला जाणार आहे.. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम पाहत असतानाच त्यांना थेट देशाचे अर्थमंत्रीपद देऊन राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचे समजते..एवढेच नव्हे तर, हा बदल केवळ एका मंत्रालयापुरता मर्यादित नसून, थेट 2029 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून देवेंद्र फडणवीस यांना पुढे आणण्यासाठी ही एक मोठी दीर्घकालीन रणनीती असू शकते, असं म्हटलं जात आहे…तर फडणवीसांचे पंख कापण्यासाठी त्यांना दिल्लीला घेऊन जात आहेत, अशी टीका विरोधक करत आहेत….

Devendra Fadnavis : 

देवेंद्र फडणवीस केंद्रात गेल्यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची धुरा पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवली जाण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे ..एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी मुख्यमंत्री असताना राबवलेल्या ‘लाडकी बहीण योजना’ यांसारख्या लोकप्रिय योजना आणि ग्रामीण भागातील त्यांची पकड पाहता, केंद्रीय नेतृत्वाचा त्यांच्यावरचा विश्वास अधिक वाढला आहे…आगामी राजकीय आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि राज्यातील प्रादेशिक अस्मितेचे राजकारण सांभाळण्यासाठी एकनाथ शिंदे सक्षम असल्याचे म्हटले जात आहे..

दिल्लीत नेमकं शिजतंय काय?

मात्र एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यात धोका असल्याचे काही नेत्यांचं मत असल्याची चर्चा आहे..कारण एकनाथ शिंदे अनेकदा भाजपला कोंडीत पकडाना दिसतात..ते अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिले आणि आपली प्रतिमा कॉमन मॅन अशी केली..त्यामुळे विधानसभा निवडणुकीत त्यांना चांगलेच यश मिळाले..त्यानंतर त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली आणि त्यांनी भाजपला मुख्यमंत्री पदसाठी अडवून धरले..यानंतर बीएमसीत, साताऱ्यात, विधान परिषद निवडणुकीत शिंदेंनी भाजपला कोंडीत धरले..त्यामुळे शिंदेंना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवलं तर ते जड जातील, असं काही नेते म्हणत असल्याची चर्चा आहे…त्यामुळे त्यांना तर मुख्यमंत्री पद काही मिळणार नाही, असं अनेकाना वाटत आहे.. मात्र जर भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी निर्णय घेतला तर काहीही होऊ शकतं…

पण अचानक या चर्चा का सुरु झाल्यात असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे..तर अनेकदा निवडणुकीच्या तोंडावर किंवा मोठ्या अंतर्गत फेरबदलांपूर्वी जनतेचा आणि कार्यकर्त्यांचा कल तपासण्यासाठी अशा प्रकारच्या बातम्या जाणीवपूर्वक चर्चेत आणल्या जातात… राजकारणात कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही आणि 24 तासांत अख्खी समीकरणे बदलू शकतात, हे पाहता या चर्चांमध्ये ठोस तथ्य असू शकतात… मात्र, जोपर्यंत राष्ट्रपती भवन किंवा भाजप संसदीय मंडळाकडून यावर अधिकृत शिक्कामोर्तब होत नाही, तोपर्यंत याला देशातील सर्वात मोठ्या संभाव्य राजकीय पुनर्रचनेचे संकेत म्हणूनच पाहिले जात आहे..तुम्हाला काय वाटतं फडणवीस केंद्रात जातील आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील का?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts