• Home
  • ताज्या बातम्या
  • विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! आयटीआयची पहिली निवड यादी आज जाहीर होणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार
शैक्षणिक बातम्या

विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! आयटीआयची पहिली निवड यादी आज जाहीर होणार; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार

ITI Admission 2026

ITI Admission 2026: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून पहिली निवड यादी ही आज सायंकाळी ५ वाजेपर्यंत जाहीर होणार आहे.

राज्यातील शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रवेश प्रक्रिया केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू करण्यात आली आहे. या प्रक्रियेअंतर्गत पहिल्या फेरीची निवड यादी आज सायंकाळी ५ वाजता जाहीर केली जाणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना ३ ते ७ जुलै दरम्यान प्रवेश निश्चित करण्याची संधी उपलब्ध असणार आहे. संपूर्ण केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया ४ ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने राबवली जाणार आहे.

हेही वाचा: नवी मुंबई हादरली! ८ महिन्यांच्या गर्भवतीसह बाळाचा मृत्यू; चुकीच्या इंजेक्शनमुळे गेला जीव, नेमकं काय घडलं?

उमेदवारांसाठी महत्वाचे निर्देश

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावरील वेळापत्रकानुसार सर्व टप्पे वेळेत पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे. प्रवेश प्रक्रियेतील नियमावली आणि मार्गदर्शक सूचना DVET Admission Portal या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.

राज्यातील सर्व आयटीआय संस्थांमध्ये दररोज १० ते ११ या वेळेत उमेदवारांसाठी मोफत मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे.

महत्त्वाच्या सूचना

उमेदवारांनी आपला लॉगिन पासवर्ड गोपनीय ठेवावा
सर्व माहिती फक्त अधिकृत संकेतस्थळावरून तपासावी.
तांत्रिक अडचणींसाठी जवळच्या आयटीआय किंवा मदत केंद्राशी संपर्क साधावा
नोंदणी केलेल्या उमेदवारांना एसएमएसद्वारे अपडेट्स दिले जाणार आहेत

अर्जाची शुल्क किती?

राखीव प्रवर्ग: 100 रुपये
अराखीव प्रवर्ग: 150 रुपये
महाराष्ट्राबाहेरील उमेदवार: 300 रुपये
अनिवासी भारतीय (NRI): 500 रुपये

प्रवेश प्रक्रिया कशी असेल?

पहिल्या फेरीसाठी व्यवसाय आणि संस्थानिहाय पर्याय (option filling) ३ जुलैपर्यंत करता येणार आहे. त्यानंतर निवड यादी जाहीर करून प्रवेश निश्चितीची प्रक्रिया ३ ते ७ जुलै दरम्यान पूर्ण केली जाईल. पुढील फेऱ्यांसाठीही त्यानुसार वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts