Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • “प्रिय कोकण, तू पुन्हा माझं मन जिंकलंस!”; स्वप्नील जोशीची वेंगुर्ल्यात खास फॅमिली ट्रिप, शेअर केला Video
मनोरंजन

“प्रिय कोकण, तू पुन्हा माझं मन जिंकलंस!”; स्वप्नील जोशीची वेंगुर्ल्यात खास फॅमिली ट्रिप, शेअर केला Video

Swapnil Joshi Vengurla Trip
29
Swapnil Joshi Vengurla Trip: कोकणावर असलेलं प्रेम अभिनेता स्वप्नील जोशीने (Swapnil Joshi Konkan Trip) पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. कुटुंबासोबत त्याने वेंगुर्ल्याला खास भेट दिली. या ट्रिपची खास झलक स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

सुप्रसिद्ध मराठी अभिनेता स्वप्नील जोशी (Marathi Actor Swapnil Joshi) याचं कोकणावरील प्रेम सर्वश्रुत आहे. कोकणातील निसर्ग, समुद्रकिनारे आणि स्थानिक खाद्यसंस्कृतीबद्दल तो अनेकदा व्यक्त होताना दिसतो. आता स्वप्नील जोशीने आपल्या कुटूंबासोबत (Swapnil Joshi Family Trip) केलेल्या वेंगुर्ले सफारीची झलक चाहत्यांसोबत शेअर केली आहे. या व्हिडिओला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत आहे.

काही वर्षांपूर्वी स्वप्नीलने (Swapnil Joshi Latest News) एका पॉडकास्टमध्ये रत्नगिरीतील आरे- वारे समुद्रकिनाऱ्याबद्दल केलेली चर्चा चांगलीच गाजली होती. त्यानंतर त्याच्या या वक्तव्यावर अनेक रिल्स आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता अभिनेत्याने कोकणातील आणखी एका निसर्गरम्य ठिकाणाचा अनुभव चाहत्यांना दाखवला आहे.

हेही वाचा: हिंजवडीकरांना मोठा दिलासा! मेट्रो स्थानकांपर्यंत पोहोचण्यासाठी २१ रस्त्यांचे जाळे; पाहा ४२६ कोटींचा मास्टर प्लॅन

वेंगुर्ल्यात कुटुंबासोबत खास मुक्काम

स्वप्नील जोशी नुकताच कुटुंबीयांसह वेंगुर्ल्याला ( Vengurla Tourism ) गेला होता. या सहलीदरम्यान तो Araqila Retreat येथे मुक्कामी होता. समुद्राच्या अगदी जवळ असलेल्या या ठिकाणाहून निसर्गाचा सुंदर अनुभव घेता येतो. आपल्या मुक्कामातील विविध क्षणांचा व्हिडीओ स्वप्नीलने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये प्रशस्त आणि आरामदायी रूम्स, बाल्कनीतून दिसणारा समुद्र, समुद्रकिनाऱ्याकडे जाणारा मार्ग, सूर्यास्ताचे मनमोहक दृश्य आणि रिसॉर्टमधील इन्फिनिटी पूल अशा अनेक गोष्टींची झलक पाहायला मिळते. कुटुंबासोबत निवांत वेळ घालवताना स्वप्नीलने या सहलीचा मनमुराद आनंद घेतल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे.

अस्सल मालवणी पदार्थांचा घेतला आस्वाद

कोकण म्हटलं की तिथल्या खाद्यसंस्कृतीची चव चाखल्याशिवाय सहल पूर्ण होत नाही. स्वप्नील आणि त्याच्या कुटुंबीयांनीही विविध पारंपरिक मालवणी पदार्थांचा आस्वाद घेतला.

शिरवाळे, फिश फ्राय, सार, बटाट्याचे काप, लाल माठाची भाजी, काजूची भाजी आणि वरण-भात अशा पदार्थांचा या सहलीत आस्वाद घेण्यात आला. याशिवाय उकडीच्या मोदकांचाही आनंद स्वप्नीलने घेतला. कोकण ही आपल्यासाठी मोठी श्रीमंती असल्याचंही त्याने या व्हिडीओच्या माध्यमातून अधोरेखित केलं.

‘माझं कोकणावर निखळ प्रेम…’

या सहलीबद्दल भावना व्यक्त करताना स्वप्नीलने आपल्या कोकणप्रेमाचा पुन्हा एकदा उल्लेख केला. काही वर्षांपूर्वी पॉडकास्टमध्ये कोकणाविषयी केलेल्या वक्तव्याला मिळालेल्या प्रतिसादाची (Swapnil Joshi Vengurla Trip ) आठवणही त्याने करून दिली.

त्याच्या मते, आरे- वारेबद्दल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली असली, तरी त्यामागे कोकणाविषयी असलेलं त्याचं प्रेम हेच खरं कारण आहे. कुटूंबासोबत वेंगुर्ल्यात काही दिवस घालवण्याची संधी मिळाल्याने हा प्रवास खास ठरल्याचं त्याने सांगितलं.

वेंगुर्ल्यातील शांत आणि निसर्गरम्य वातावरणात कुटुंबासोबत वेळ घालवता आला, दैनंदिन धावपळीपासून थोडं दूर जाता आलं आणि निवांत क्षण अनुभवता आले, असं स्वप्नीलने सांगितलं. या अनुभवामुळे पुन्हा एकदा कोकणाने आपलं मन जिंकल्याची भावना त्याने व्यक्त केली.

स्वप्नीलने शेअर केलेल्या या खास व्हिडीओवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया दिल्या आहेत. मराठी मनोरंजनसृष्टीतील कलाकारांनीही त्याच्या कोकण सफरीचं आणि व्हिडीओचं कौतुक केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts