Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • IPL 2026 : नाव बदललं पण नशिब नाही बदललं, ‘या’ ३ संघाची १८ वर्षाची चॅम्पियन होण्याची प्रतीक्षा यंदा संपणार?
Top News

IPL 2026 : नाव बदललं पण नशिब नाही बदललं, ‘या’ ३ संघाची १८ वर्षाची चॅम्पियन होण्याची प्रतीक्षा यंदा संपणार?

IPL Season 19

IPL 2026 Season : मागील काही महिन्यांपासून बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षीत आयपीएल सीजन १९ चा हंगाम  (IPL Season 19) २८ मार्चपासून सुरु आहे आहे. यानिमित्ताने चर्चा रंगत आहे ती, मागील १८ वर्षापासून चॅम्पियन विजेता (Champion Winner) होण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स संघाची. यातील दोन संघाने तर नाव बदललं पण, त्यांचे नशीब काय बदललले नाही. यंदा यातील एका संघाची १८ वर्षाची प्रतीक्षा संपणार (18-Year Wait Comes to an End) का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

१९ व्या हंगामासाठी एकूण १० संघांनी आतापर्यंत जोरदार सराव केला आहे. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे या स्पर्धेच्या मोसमातील २ यशस्वी संघ आहेत. दोन्ही संघांनी प्रत्येकी ५-५ वेळा आयपीएल ट्रॉफी जिंकण्याची कामगिरी केली आहे. एका बाजूला या २ संघांनी ५-५ वेळा ट्रॉफी उंचावली आहे.

हेही वाचा – आयपीएलच्या इतिहासात ‘या’ पाच गोलंदाजांनी घातलाय धुमाकूळ, सर्वाधिक निर्धाव षटके टाकत केलाय विक्रम

१८ वर्षांपासून चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा

तर दुसऱ्या बाजूला लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स यांच्यासारखे असे काही संघ आहेत ज्यांची गेली काही वर्षांपासून आयपीएल चॅम्पियन होण्याची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आपली प्रतिक्षा संपवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आरसीबीचं हे स्वप्न १८ व्या मोसमात पूर्ण

लखनौ सुपर जांयट्स, पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिट्ल्स या 3 संघांना आतापर्यंत एकदाही आयपीएल चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवता आलेला नाही. या ३ संघांप्रमाणे आरसीबी अर्थात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु टीमचंही गेल्या १७ मोसमापासून आयपीएल ट्रॉफी जिंकण्याचं स्वप्न होतं. आरसीबीचं हे स्वप्न १८ व्या मोसमात पूर्ण झालं. रजत पाटीदार याच्या नेतृत्वात आरसीबीने १८ वर्षांची प्रतिक्षा संपवली. त्यामुळे यंदा या तिघांपैकी कोणता संघ आरसीबीप्रमाणे आयपीएल ट्रॉफीची प्रतिक्षा संपवण्यात यशस्वी ठरतो याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असणार आहे.

नाव बदलून काही चमत्कार होतो का?

दिल्ली आणि पंजाब या संघांचं नाव बदललंय. नाव बदलून काही चमत्कार होतो का? हा प्रयोगही दिल्ली आणि पंजाबकडून करण्यात आला. मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. दिल्ली कॅपिट्ल्सचं आधीचं नाव हे दिल्ली डेरडेव्हिल्स असं होतं. तर पंजाब किंग्स आधी किंग्स इलेव्हन पंजाब होती.

आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं

दरम्यान आतापर्यंत पंजाबचं २ वेळा तर दिल्लीचं एकदा आयपीएल चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलंय. किंग्स इलेव्हन पंजाब २०२४ तर पंजाब किंग्स २०२५ साली उपविजेता राहिली. तर दिल्ली कॅपिट्ल्स २०२० साली आयपीएल ट्रॉफीपासून १ पाऊल दूर राहिली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts