• Home
  • ताज्या बातम्या
  • भायखळा रेल्वे स्थानकातील शौचालयात तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न
Mumbai

भायखळा रेल्वे स्थानकातील शौचालयात तरुणीने केला आत्महत्येचा प्रयत्न

Young woman attempts suicide

Young woman attempts suicide : विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेल्या मानसिक तणावाचा एक गंभीर प्रकार मुंबईतील भायखळा रेल्वे स्थानकात (Bhaykhala Railway Station) घडला. स्थानकातील महिलांच्या शौचालयात एका महाविद्यालयीन तरुणीने आत्महत्येचा (Suicide Attempt) प्रयत्न केला आहे. मानसिक तणावामुळे पीडित महिलेने शौचालयातच (The woman’s toilet) मनगट कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न (Attempted suicide by cutting wrists) केला. या घटनेमुळे प्रवासी आणि स्थानकातील कर्मचारी यांच्यात खळबळ उडाली.

हेही वाचा – शाळकरी मुलांची हातात कोयता घेऊन भरदिवसा दहशत, विद्यार्थ्यांना शिवीगाळ करत धमकावले

मिळालेल्या माहितीनुसार, बराच वेळ शौचालयात असलेल्या महिलेने दरवाजा उघडला नाही आणि आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. परिस्थिती संशयास्पद वाटल्याने एका महिलेने तात्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिस घटनास्थळी पोहोचले, दरवाजा तोडून आत गेले. आता महाविद्यालयीन तरुणी जखमी अवस्थेत आढळली. तिला उपचारासाठी तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले.

डॉक्टरांच्या मते, तरुणीची प्रकृती सध्या स्थिर आहे आणि तिच्यावर उपचार सुरू आहेत. मानसिक तणावामुळे तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. रेल्वे पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत विद्यार्थिनी मानसिक तणावाखाली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मात्र तिची प्रकृती पूर्णपणे सुधारल्यानंतरच तिचा सविस्तर जबाब नोंदवून नेमके कारण स्पष्ट केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

या घटनेमुळे विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक, कौटुंबिक आणि सामाजिक दबाव पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वेळेवर संवाद, समुपदेशन आणि मानसिक आरोग्यासाठी सहज उपलब्ध मदत व्यवस्था आवश्यक असल्याचे मत शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts