• Home
  • राजकारण
  • अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्याचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध
Pune

अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून पुण्याचा एकत्रित जाहीरनामा प्रसिद्ध

Ajit Pawar Supriya Sule Pune Manifesto

Ajit Pawar Supriya Sule Pune Manifesto : सध्या राज्यात २९ महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष प्रचार सभा घेत आहेत. तर काही नेते मतदारांना जाहीरनामा जाहीर करून आश्वासित करत आहेत. पुणे महानगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा जाहीरनामा जाहीर करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एकत्रित हा जाहीरनामा जाहीर करण्यात आलाय. अष्टसूत्री प्रगतीची अष्टावधानी नेतृत्वाची’ या जाहीरनाम्यात मुख्य आठसूत्री कार्यक्रमाबरोबरच पुण्याच्या सर्वांगीण विकासाची हमी देण्यात आली आहे.

हेही वाचा – ज्यांना राजकारणात पोरं होत नाहीत ते आमची पोरं पळवत आहेत; उद्धव ठाकरेंच्या हल्लाबोल

या जाहीरनाम्यात पुणे शहरातील सर्व भागात नळाद्वारे दररोज पाणी, ट्राफिक आणि खड्डेमुक्त पुणे, नव्याने समाविष्ट गावात शहर मानकांनुसार रस्त्याची निर्मिती, शहराची नियमित स्वच्छता आणि सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या गोष्टी जाहीरनाम्यात मांडण्यात आल्या आहेत. तसेच आधुनिक दर्जाच्या आरोग्य सुविधा परवडणाऱ्या किफायतशीर दरात, पर्यावरण संवर्धनासह प्रदूषणमुक्त पुणे, झोपडपट्टी पुनर्वसन आणि जुन्या इमारतींचा पुनर्विकास, उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी पुणे मॉडेल स्कूलची निर्मिती आणि डिजिटल शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब्लेट्स, आणि सर्व आश्वासनाची अंमलबजावणी करण्याचे उत्तरदायित्व देखील आघाडीने स्वीकारले आहे.

यामुळे मागील काळात थांबलेला पुण्याचा विकास पुन्हा सुरू करण्यासाठी पुणेकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला साथ देतील हा विश्वास सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी व्यक्त केला आहे. याप्रसंगी खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे, यांच्यासह दोन्ही महत्त्वाचे मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts