Breaking News :
Pune

अंबादास दानवे स्वतः उतरून मदतीला धावले

Ambadas Danve helps on ground
201

छत्रपती संभाजीनगर-अहिल्यानगर महामार्गावरील इसारवाडी फाट्यावर रात्री उशिरा झालेल्या ट्रक-टेम्पोच्या भीषण अपघातात दोन तरुण गाडीत अडकले होते. यावेळी पुणे दौऱ्यावर निघालेले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे स्वतः गाडीतून उतरून बचावकार्यात सहभागी झाले. दानवे यांनी ताफा थांबवत जखमींना बाहेर काढले, रुग्णवाहिका आणि क्रेनची तात्काळ व्यवस्था केली. अखेर सुहास कांबळे आणि पवन पठारे या दोन शेतकरी मुलांना एका तासाच्या अथक प्रयत्नांनंतर वाचवण्यात यश आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts