• Home
  • राजकारण
  • राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! अंबादास दानवेंनी पोस्ट केला पैशांचा व्हिडिओ
Top News

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ! अंबादास दानवेंनी पोस्ट केला पैशांचा व्हिडिओ

Ambadas Danve

Ambadas Danve MLA money video : सध्या राज्याचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. यंदाचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन ८ डिंसेबरपासून सुरू झालं आहे. या अधिवेशनात कोणते मुद्दे गाजणार? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं. असे असताना दुसऱ्याच दिवशी राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारी घटना समोर आली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मिडियावर पुन्हा एकदा एक व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.

हेही वाचा – भाजपच्या माजी खासदाराने महत्त्वाचं पद धुडकावल, नाराजीच्या चर्चेला उधाण

अंबादास दानवे यांनी एक्स अकाऊंटवर हा पैशांचा व्हिडिओ शेअर केला आहे. दानवे यांनी या पोस्टद्वारे विचारलं आहे, हे आमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? अशी विचारणा त्यांनी केली आहे. महत्त्वाचं म्हणजे त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नाही. त्यामुळे हा आमदार कोण आहे, याबाबत राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. अंबादास दानवे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व महाराष्ट भाजप यांना टॅग केलं आहे.

सरकारकडं फक्त शेतकरी कर्जमाफी करायला पैसे नाहीत – अंबादास दानवे 

दानवे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, या सरकारकडं फक्त शेतकरी कर्जमाफी करायला पैसे नाहीत.. बाकी सगळं एकदम ओके आहे! जनेला जरा सांगा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिदें जी हेआमदार कोण आहेत आणि पैशांच्या गड्ड्यांसह काय करत आहेत? त्यांनी शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये पैशांनी भरलेली बॅग दिसत आहेत. आणि त्यामध्ये सर्व पैसेच पैसे दिसत आहेत. त्यामुळे ही पैशांची बॅग नेमकी कोणत्या आमदाराची आहे हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाहीभरत गोगावले

त्यात आमदार कोण आहे आणि किती बंडलं आहेत, हे आम्ही आतापर्यंत पाहिलेले नाही. अंबादास यांच्याकडे काही शोध मोहीम आहे का? आम्ही सत्ताधारी आहोत. तीन पक्षांमधील कोण आमदार आहे? काय आहे? हे कसले पैसे आहेत? हे तरी कळायला हवे. ते अनेक वेळेला तक्रार करतात. परंतु, वस्तुस्थिती काय आहे हे तपासणे गरजेचे आहे. अंबादास दानवे यांच्याकडे सध्या कुठलेही पद नाही. त्यामुळे कदाचित त्यांची शोध मोहीम सुरू असेल, अशी प्रतिक्रिया शिवसेना शिंदे गटाचे मंत्री भरत गोगावले यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts