Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • Apple युजर्ससाठी धक्का! आता Siri च्या AI फीचर्ससाठी करावे लागणार सबस्क्रिप्शन
Top News

Apple युजर्ससाठी धक्का! आता Siri च्या AI फीचर्ससाठी करावे लागणार सबस्क्रिप्शन

Siri AI Subscription

Siri AI Subscription: Apple ने नुकतेच आपल्या siri चे AI व्हर्जन सादर केले असून यामुळे वापरकर्त्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र, एका नवीन रिपोर्टनुसार siri मधील सर्व अ‍ॅडव्हान्स AI फीचर्स मोफत उपलब्ध राहणार नाहीत आणि भविष्यात त्यासाठी स्वतंत्र सबस्क्रिप्शन घ्यावे लागू शकते.

WWDC 2026 मध्ये अँपल ने सिरीच्या नव्या AI क्षमतांची झलक दाखवली होती. iOS २७ अपडेटसोबत हे फीचर्स iPhone युजर्ससाठी रोलआउट होण्याची शक्यता आहे. पण आता समोर आलेल्या माहितीनुसार, या फीचर्सच्या वापरासाठी युजर्सना अतिरिक्त खर्च करावा लागू शकतो.

हेही वाचा : केंद्र सरकार अॅक्शन मोडमध्ये! ‘या’ तारखेपर्यंत टेलिग्रामवर काही सुविधा बंद राहणार; जाणून घ्या नवीन नियम

आता Apple कडून नवीन मॉडेलची तयारी?

मिळालेल्या माहितीनुसार, AI फीचर्स चालवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सर्व्हर आणि कम्प्युटिंग पॉवर लागते, ज्यामुळे कंपन्यांचा खर्च वाढतो. त्यामुळे Apple Siri साठी स्वतंत्र AI सबस्क्रिप्शन मॉडेल आणण्याचा विचार करत आहे.

यामध्ये बेसिक siri सेवा मोफत राहू शकते, तर जनरेटिव Ai आणि अ‍ॅडव्हान्स फंक्शन्ससाठी शुल्क आकारले जाऊ शकते. हे मॉडेल ChatGPT आणि Google Gemini सारख्या सेवांप्रमाणे असू शकते. मात्र सध्या अँपल कडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

AI स्पर्धेत Apple ची नवी रणनीती

AI क्षेत्रात स्पर्धा वाढत असताना अँपल आपले सिरी एआय अधिक मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कंपनीचे उद्दिष्ट अधिक स्मार्ट आणि वैयक्तिक अनुभव देणारे फीचर्स युजर्सपर्यंत पोहोचवणे आहे. परंतु, प्रीमियम AI फीचर्स भविष्यात सबस्क्रिप्शनवर आधारित असू शकतात, अशी चर्चा सध्या टेक वर्तुळात सुरू आहे.

Siri AI मध्ये नेमकं काय बदल अपेक्षित?

नवीन Siri अधिक प्रगत आणि इंटरॅक्टिव्ह असणार आहे.
युजरच्या स्क्रीनवरील माहिती समजून उत्तर देणे
अ‍ॅप्ससोबत अधिक स्मार्ट इंटिग्रेशन
सुधारित व्हॉइस आणि कॉन्टेक्स्ट समज क्षमता
अधिक वैयक्तिक आणि नैसर्गिक संवाद

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts