Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अशोक खरातचा आणखी एक कारनामा; गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार
गुन्हा

अशोक खरातचा आणखी एक कारनामा; गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार

kharat nashik

ashok kharat nashik : नाशिकमधील नाशिकमध्ये स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (ashok kharat) याचा आणखी एक कारनामा पुढे आला आहे. त्याने गर्भवती महिलेवर (pregnant woman) अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाणे (Sarkarwada Police station ) येथे हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

हे ही वाचा: अशोक खरातची आर्थिक ‘माया‘ आणि शासकीय अधिकारीही ‘वाया‘?

‘पूजा विधी’च्या नावाखाली अत्याचार

तक्रारीनुसार, पीडित महिला गर्भवती असताना ‘पूजा विधी’च्या नावाखाली खरातने तिच्यावर लैंगिक अत्याचार (Sexual assault) केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. इतकेच नव्हे, तर या प्रकाराची माहिती बाहेर दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही उल्लेख तक्रारीत आहे. महिलेसोबत येणाऱ्या तिच्या पतीला बाहेर बसवून, आतमध्ये ‘उपचार’ किंवा ‘विधी’च्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

आणखी तीन महिलांच्या तक्रारी

दरम्यान, अशोक खरातविरोधात आणखी तीन पीडित महिलांनी पुढे येत तक्रार नोंदवण्याची तयारी दर्शवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या तिन्ही महिलांना विश्वासात घेऊन त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी गोपनीय पद्धतीने चौकशी करण्यात येत आहे. विशेष तपास पथक या महिलांचे जबाब अत्यंत संवेदनशीलतेने नोंदवत असून, नव्या साक्षींमुळे खरातविरोधातील पुरावे अधिक मजबूत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

खरातला अज्ञातस्थळी हलवले

गेल्या तीन दिवसांपासून गुन्हे शाखा कार्यालय आणि पोलीस क्लब येथे अशोक खरातची चौकशी सुरु होती. मात्र, आज रविवारी एसआयटीने चौकशीचे ठिकाण अचानक बदलले असून खरातला अज्ञातस्थळी हलवले आहे. या कारवाईदरम्यान प्रचंड गोपनीयता आणि खबरदारी घेतल्याची माहिती समोर येत आहे. या चौकशीला एसआयटी प्रमुख आयपीएस अधिकारी तेजस्विनी सातपुते स्वतः उपस्थित राहून तपासावर बारकाईने लक्ष ठेवत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts