Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • नाशिकच्या खरात फाइल्सनंतर आता कल्याणमध्ये ‘पमी गुरू’ …!
ताज्या बातम्या

नाशिकच्या खरात फाइल्सनंतर आता कल्याणमध्ये ‘पमी गुरू’ …!

kalyan news

कल्याण: प्रमोद तांबे

kalyan pami guru : नाशिकनंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण परिसरात (kalyan) भोंदूगिरीचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ‘पमी गुरू’ (pami guru) नावाच्या तृतीयपंथी व्यक्तीचे अजब दावे आणि सोशल मीडियावरील व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत असून, या प्रकरणामुळे अंधश्रद्धेचा (Superstition) मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

हे ही वाचा: अशोक खरातचा आणखी एक कारनामा; गर्भवती महिलेवर लैंगिक अत्याचार

‘पमी गुरू’ च्या अंगावर करोडो रुपयांचे सोने

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये ‘पमी गुरू’ अंगावर करोडो रुपयांचे सोने, महागड्या गाड्या आणि आलिशान जीवनशैली दाखवत रील्स बनवत असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे, त्यांच्या ‘आशीर्वादामुळे’ मुलं होत नाहीत, नोकरीत अडचणी, कुटुंबातील वाद अशा समस्या दूर होतात, असे दावे या व्हिडिओंमधून करण्यात येत आहेत.या दाव्यांमुळे अनेक सुशिक्षित महिलादेखील महाराष्ट्रातील विविध भागांतून ‘पमी गुरू’कडे येत असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मुलं जन्माला आली, असेही काहींनी व्हिडिओत म्हटले आहे.

पोलीस आणि राजकीय मंडळींची उपस्थिती चर्चेत

या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, काही व्हिडिओंमध्ये पोलीस अधिकारी वर्दीवरच ‘पमी गुरू’च्या दरबारात जाऊन आशीर्वाद घेत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे पोलीस यंत्रणाच अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याची टीका होत आहे.

खासदार सुरेश म्हात्रेही गुरुला भेटले?

तसेच भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे (बाल्या मामा) (mp suresh mhatre) हे देखील या गुरूला भेटायला आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

नाशिकमधील प्रकरणानंतर पुन्हा प्रश्नचिन्ह

नाशिक जिल्ह्यातील अशोक खरात प्रकरणानंतर राज्यात अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीविरोधात कारवाईची मागणी जोर धरत असतानाच, कल्याणमधील हे नवे प्रकरण समोर आल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

चौकशीची मागणी

या सर्व व्हायरल व्हिडिओंच्या पार्श्वभूमीवर ‘पमी गुरू’च्या दाव्यांची सत्यता, आर्थिक व्यवहार आणि संबंधित व्यक्तींशी असलेले संबंध यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन कायद्यांतर्गत कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts