Breaking News :
ताज्या बातम्या

सिंधुदुर्गात पोलिसांची हायअलर्ट बैठक

sindhudurg

sindhudurg police : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली असून, मुख्यालय पोलीस तसेच देवगड (devgad), कणकवली (kankavali), कुडाळ (kudal) आणि सावंतवाडी (sawantwadi) येथील पोलीस निरीक्षकांची (police inspector) तातडीची बैठक स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या हॉलमध्ये सुरू आहे. या बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत ठेवण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत.

हे ही वाचा: नाशिकच्या खरात फाइल्सनंतर आता कल्याणमध्ये ‘पमी गुरू’ …!

राजू शेट्टी आंदोलन

उद्याच्या राजू शेट्टी (raju shetty) यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी असलेल्या गाड्यांना जसे की गॅस सिलेंडर, भाजीपाला आणि धान्य वाहने यांना मुभा दिली जाणार आहे. मात्र, ज्या वाहनांमध्ये चारपेक्षा अधिक प्रवासी आढळतील, त्या वाहनांची सखोल चौकशी केली जाणार आहे.

वाहनाची काटेकोर तपासणी

तसेच, कोणत्याही गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी पोलीस पंक्चर दुरुस्ती केंद्रांवरही लक्ष ठेवून आहेत. टायर साठवणूक आणि विक्री याबाबत चौकशी केली जात असून, कोणालाही टायर देऊ नयेत, अशा सूचना दिल्या जात आहे.दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून सिंधुदुर्गमध्ये येणाऱ्या प्रत्येक वाहनाची काटेकोर तपासणी करूनच प्रवेश दिला जाणार असल्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला आहे. सिंधुदुर्ग पोलिसांची ही कारवाई संभाव्य धोके टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची ठरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts