• Home
  • राजकारण
  • IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांना तात्काळ निलंबित करा; भाजप आमदाराची मागणी
ताज्या बातम्या

IAS अधिकारी तुकाराम मुंडे यांना तात्काळ निलंबित करा; भाजप आमदाराची मागणी

IAS Officer Tukaram Munde

Suspend IAS Tukaram Munde : सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्याविरुद्ध भाजप आमदार विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवणार असून त्यांच्या निलंबनाची मागणी करणार असल्याचं समोर आलं. यासंदर्भात वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या बातम्यानंतर, तुकाराम मुंडे प्रकरणी लक्षवेधी मांडून त्यांना निलंबित करण्याची मागणी करणारे भाजप आमदार कृष्णा खोपडे यांना धमकीचे दोन कॉल आल्यानंतर कृष्णा खोपडे यांनी नागपूर पोलिसांकडे त्याची तक्रार केली आहे.

या तक्रारीत फोनवरुन धमकी देणाऱ्या व्यक्तीचा मोबाईल नंबर आणि नावही त्यांनी लिहून दिलं आहे. तुम्ही तुकाराम मुंढेंविरुद्ध का बोलत आहात, त्यांच्या निलंबनाची मागणी तुम्ही का करत आहात? असे प्रश्न विचारण्यात आले आणि त्यानंतर संबंधित व्यक्तीवर फोनवर आमदार खोपडे यांनी धमकी दिल्याची माहिती खुद्द दस्तूर आमदरांनी दिली आहे.

धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल

आमदार कृष्णा खोपडे यांनी मुख्यमंत्री कार्यालय, विधानसभा अध्यक्ष यांचे कार्यालय याशिवाय नागपूरचे पोलीस आयुक्त तसेच स्थानिक पोलिसांत धमकीच्या काॅल संदर्भात तक्रार दाखल केली आहे. तुकाराम मुंडे यांच्या विरोधात कारवाईची मागणी केल्यानंतर मला पाहून घेण्याची धमकी आणि शिवीगाळ करणारे फोन कॉल येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटलं आहे. ज्या दोन फोन क्रमांकावरून धमकीचे कॉल आले, ते दोन्ही नंबर पोलिसांना देत कृष्णा खोपडे यांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.

आमदार खोपडे यांनी तुकाराम मुंडे यांच्या विरोधात मांडली होती लक्षवेधी

विशेष म्हणजे भाजप आमदार हिवाळी अधिवेशनात तुकाराम मुंडे यांच्या विरोधात लक्षवेधी मांडून नागपूरात नियमबाह्य पद्धतीने स्मार्ट सिटीचा कार्यभार बळकावून आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी आणि महिला अधिकाऱ्यांशी दुर्व्यवहार केल्याप्रकरणी कारवाईची मागणी करणार आहे, अशी बातमी माध्यमांनी दाखविली होती. त्यानंतर, आपणास दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास फोनवरुन धमकी आल्याचं आमदार खोपडे यांनी म्हटलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts