• Home
  • राजकारण
  • हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक; राहुरीत पुतळा दहन
Top News

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक; राहुरीत पुतळा दहन

Burning of Rahuri statue

Burning of Rahuri statue : अहिल्यानगरच्या राहुरीमध्ये आज राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपकडून आक्रमक आंदोलन छेडण्यात आलं. जिल्हा बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांनी संतप्त प्रतिक्रिया देत सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन केलं.

हेही वाचा – ‘ईव्हीएम मशीन हॅकच्या नावाखाली उमेदवारांकडून लाखो रुपये उकळले’; सत्ताधारी आमदाराचा भाजपवर गंभीर आरोप

छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. सपकाळ यांनी शिवरायांची तुलना टिपू सुलतान यांच्याशी केल्याचा आरोप करत भाजप आक्रमक झाली आहे. राहुरी शहरातील शनी मंदिर परिसरात कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत सपकाळ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले होते.

सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

राज्यभरात सपकाळ यांच्या विरोधात तीव्र निदर्शने हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने करण्यात येत आहे. आज राहाता शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांचे प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी सपकाळ यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

कपडे काढून त्याला चोप देऊन गाढवावरून त्याची धिंड काढा

प्रसंगी अक्षय कर्डिले यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सपकाळ जेथे दिसतील तेथे त्याचे कपडे काढून त्याला चोप देऊन गाढवावरून त्याची धिंड काढा अशा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आणि कठोर कारवाईची मागणी केली. आंदोलनानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांना निवेदन देत सपकाळ यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.दरम्यान, या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts