• Home
  • महाराष्ट्र
  • अमरावतीत CHO चे बेमुदत आंदोलन; ११ मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी
Top News

अमरावतीत CHO चे बेमुदत आंदोलन; ११ मागण्यांवर तोडगा काढण्याची मागणी

Amravati movement

Amravati movement : अमरावती जिल्ह्यातील समुदाय आरोग्य अधिकारी (CHO) यांनी त्यांच्या ११ प्रमुख मागण्यांसाठी आजपासून जिल्हा परिषदेसमोर बेमुदत आंदोलन सुरू केले. मागील अनेक महिन्यांपासून चर्चेनंतरही ठोस निर्णय न झाल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारल्याचे संघटनेने स्पष्ट केले. आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

हेही वाचा – हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावरून भाजप आक्रमक; राहुरीत पुतळा दहन

प्रलंबित प्रोत्साहनपर (Incentive) रकमेचा तात्काळ भरणा, भविष्यातील देयकांसाठी निश्चित वेळापत्रक जाहीर करणे, दुर्गम भागात कार्यरत अधिकाऱ्यांसाठी सुरक्षा व निवास सुविधा, अतिरिक्त कामासाठी स्वतंत्र मानधन, तसेच बदली प्रक्रियेत पारदर्शकता या प्रमुख मागण्या आहेत. नेटवर्क अडचणीच्या भागात ऑफलाइन रिपोर्टिंग व्यवस्था लागू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.

ग्रामीण आरोग्य सेवेत CHO मातृ-बाल आरोग्य, लसीकरण व संसर्गजन्य रोग नियंत्रणात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र सेवाशर्ती व प्रशासकीय प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असल्याने नाराजी वाढल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. “न्याय ११ मागण्या मान्य करा” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेकडो कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले असून मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरूच राहील, असा इशाराही देण्यात आला. शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts