• Home
  • महाराष्ट्र
  • भायखळा परिसरात बांधकाम साईटवर काम करताना 5 कामगार जखमी, दोघांचा मृत्यू
Top News

भायखळा परिसरात बांधकाम साईटवर काम करताना 5 कामगार जखमी, दोघांचा मृत्यू

website 9 5

Byculla Construction Site Accident : मुंबईती भायखळा परिसरात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी सुरु असलेल्या एका इमारतीच्या पायाभरणी आणि ढिगाऱ्याच्या कामकाजादरम्यान दुर्घटना घडली आहे. येथील कामगारांवर माती आणि चिख कोसळल्याने काही कामगार जखमी झाले आहे. तर काहींना या ढिगातून बाहेर काढण्यात आले आहे.

ही दुर्घटना आज दुपारी 2 वाजून 41 मिनिटांनी घडल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई येथे असलेल्या भायखळा परिसरातील हबीब मॅन्शन, हंस रोड याठिकाणी एका इमारतीचे बांधकाम सुरु होते. याठिकाणी पायाभरणीचे काम सुरु असतानाच काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रचंड प्रमाणात माती आणि चिखल चा काही भाग कोसळला. या दुर्घटनेत 5 कामगार मातीत अडकले होते. त्यांना बाहेर काढण्यात आता यश आले असून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार या दुर्घटनेत 5 कामगार ढिगाऱ्याखाली अडकले होते. त्यांना बाहेर काढून नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यापैकी 2 घाना नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. उर्वरित कामगारांवर रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

या संपूर्ण घटनेमुळे परिसरात हालहाल व्यक्त केली जात असून आता कामगारांच्या सुरक्षेच्या उपाययोजनांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. पोलीस आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे. (Byculla Construction Site Accident)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts