क्रीडा

अ‍ॅशले गार्डनरची दमदार खेळी; गुजरातचा युपीवर 10 धावांनी विजय

GG Beat UPW

GG Beat UPW : गुजरात जायंट्सनं महिला प्रीमियर लीगमधील एका रोमांचक सामन्यात यूपी वॉरियर्सचा 10 धावांनी पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातनं 4 बाद 207 धावांचा मोठा डोंगर उभा केला. कर्णधार अ‍ॅशले गार्डनरच्या शानदार 65 आणि जॉर्जिया वेअरहॅमच्या 10 चेंडूत 27 धावांमुळं गुजरातला ही प्रभावी धावसंख्या गाठता आली. प्रत्युत्तरात फोबी लिचफिल्डच्या जलद 78 धावांच्या खेळीनंतरही, यूपी सामना जिंकू शकला नाही.

फोबी लिचफिल्डचा डाव निष्फळ :

गुजरातच्या 208 धावांच्या लक्ष्याला उत्तर देताना, यूपीची सुरुवात खराब झाली. किरण नवगिरे फक्त 1 धावेवर बाद झाली. मात्र, कर्णधार मेग लॅनिंगनं फोबी लिचफिल्डला 30 धावांनी उत्कृष्ट साथ दिली. इतर कोणतीही खेळाडू लक्षणीय प्रभाव पाडू शकली नाही. हरलीन देओल धावा करु शकली नाही आणि दीप्ती शर्मा 1 धावेवर बाद झाली. दरम्यान, सोफी एक्लेस्टोननं शेवटी 10 चेंडूत 27 धावा केल्या, पंरतु त्या संघाला विजय मिळवून द्यायला पुरेशा नव्हत्या.

गुजरातची मोठी धावसंख्या :

गुजरात प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरला. अनुष्का शर्मानं 30 चेंडूत 44 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. तिनं आणि कर्णधार गार्डनरनं मिळून तिसऱ्या विकेटसाठी 103 धावांची भागीदारी केली. गार्डनरनं 41 चेंडूत सहा चौकार आणि तीन षटकारांसह संघाला बळकटी दिली. त्याआधी, सलामीवीर सोफी डेव्हिन सहाव्या षटकात 38 धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतली होती. ऑस्ट्रेलियन खेळाडू गार्डनरला 18व्या षटकात सोफी एक्लेस्टोननं बाद केलं. त्यानंतर वेअरहॅमनं जबाबदारी स्वीकारली. तिनं फक्त 10 चेंडूत नाबाद 27 धावा केल्या, त्यात एक चौकार आणि तीन षटकार मारले. तिच्या आक्रमक फलंदाजीनं गुजरात जायंट्सची धावसंख्या 200 च्या पुढे गेली. भारती फुलमाळी देखील सात चेंडूत 14 धावांवर नाबाद राहिली.

सोफी एक्लेस्टोनच्या दोन विकेट :

यूपी वॉरियर्सकडून सोफी एक्लेस्टोननं 32 धावांत दोन बळी घेतले. शिखा पांडे आणि डिएंड्रा डॉटिन यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. भारताची स्टार गोलंदाज दीप्ती शर्मा या सामन्यात एकही विकेट घेऊ शकली नाही. तिनं तीन षटकांत 32 धावा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts