MP Police Recruitment 2026 | मध्य प्रदेशमध्ये पोलीस भरतीबाबतची (MP Police Recruitment 2026) मोठी माहिती समोर आली आहे. पोलीस भरतीसाठी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी हिरवा कंदील दिला आहे. के. एफ. रुस्तम जी पुरस्कार सोहळ्यात मुख्यमंत्री मोहन यादव यांनी मोठी घोषणा केली आहे.
हेही वाचा – दिव्यांग उमेदवारांना मोठा दिलासा; 30 जूनपर्यंत रेल्वे परीक्षेत मोठी सूट, सहाय्यकासह बसण्याची परवानगी
मुख्यमंत्री मोहन यादव यांनी पोलीस भरतीबाबत नेमकी काय केली घोषणा?
मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, यावर्षी पोलीस विभागात 10,000 नवीन पदांच्या भरतीला मंजुरी दिली जात आहे. विभागात 22,500 पदे रिक्त असून उर्वरित रिक्त पदांनाही लवकरच मंजुरी दिली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री मोहन यादव यांनी केली आहे.
मध्य प्रदेश पोलिसांच्या कामगिरीचा उल्लेख करताना मुख्यमंत्री मोहन यादव म्हणाले की, पोलीस दलामुळे चंबळच्या दऱ्याखोऱ्यांमधून दरोडेखोरांचे पूर्णपणे उच्चाटन झाले आहे. मागील दोन वर्षांमध्ये ‘लाल सलाम’ला अंतिम सलामी देण्यात आली आहे. मध्य प्रदेश हे नक्षलवादमुक्त होणारे देशातील पहिले राज्य ठरले आहे, असं मोहन यादव म्हणाले.
पुढे मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी आर्थिक प्रोत्साहन रकमेतही लक्षणीय वाढ केली आहे. त्यांनी जाहीर केले की, पोलीस महासंचालक स्तरावरील प्रोत्साहन रक्कम जी पूर्वी 25,000 रुपये होती ती आता 50,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच पोलीस अधीक्षक स्तरावर देण्यात येणारी बक्षीस रक्कमही दुप्पट करण्यात आली आहे. ही रक्कम पूर्वी 10,000 रुपये होती जी आता 20,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहितीही मुख्यमंत्री मोहन यादव यांनी दिली आहे.









