• Home
  • राजकारण
  • हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला फुटला, माजी नगराध्यक्षाचा शिंदे गटात प्रवेश
ताज्या बातम्या

हितेंद्र ठाकूर यांचा बालेकिल्ला फुटला, माजी नगराध्यक्षाचा शिंदे गटात प्रवेश

Shivsena Shinde Group

राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. नगर पालिका आणि नगर परिषदांचे मतदान पार पडले आहे. याचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर होणार आहे. त्यानंतर राज्यातील महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांचीही निवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता सर्वच सत्ताधारी पक्षांनी तयारीला सुरुवात केली आहे. तसेच अनेक नेते आता पक्षांतर करताना दिसत आहे. अशातच आता एकनाथ शिंदे यांनी वसई विरार हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्लाच फोडला आहे. येथील एका माजी नगराध्यक्षाने शिंदे गटात आज प्रवेश केल्याची माहिती दस्तुर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे वसई विरार येथे शिंदे गटाची मोठी ताकद वाढली आहे.एकनाथ शिंदे यांनी वसई विरार हा बहुजन विकास आघाडीचा बालेकिल्लाच फोडला आहे. येथील एका माजी नगराध्यक्षाने शिंदे गटात आज प्रवेश केल्याची माहिती दस्तुर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे वसई विरार येथे शिंदे गटाची मोठी ताकद वाढली आहे.

हेही वाचा – भटके कुत्रे असो किंवा…मग निवडणुकांबाबत होणाऱ्या घोळाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जातीने लक्ष घालायला हवे – शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य

माजी नगराध्यक्ष विशाल पाटील यांचा शिंदे गटात प्रवेश

शिवसेनेने आपल्या सोशल मीडिया पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात पक्षाने लिहिले की, शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज पालघर जिल्ह्यातील वसई विरार येथील बहुजन विकास आघाडीचे माजी नगरसेवक आणि माजी नगराध्यक्ष विशाल पाटील तसेच माजी नगरसेवक भूषण पाटील, अमोल पाटील आणि तुषार पाटील यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी या सर्वांचे एकनाथ शिंदे यांनी पक्षात स्वागत करून त्यांना भावी सामाजिक आणि राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी माजी आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.

कल्याण डोंबिवलीमध्येही शिवसेनेची ताकद वाढली

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वीही शिवसेनेची ताकद वाढली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण डोंबिवली महापालिकेचे माजी नगरसेवक विकास म्हात्रे आणि माजी नगरसेविका कविता म्हात्रे, संदेश पाटील आणि बाळा म्हात्रे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेन ठाकरे गटाच्या महिला शहर संघटीका मंगला सुळे यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांना पुढील राजकीय आणि सामाजिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मंत्री उदय सामंत, विश्वनाथ राणे, बंडू पाटील, नितीन पाटील यांच्यासह स्थानिक पदाधिकारी, शिवसैनिक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts