• Home
  • ताज्या बातम्या
  • 264 धावा करुनही दिल्लीचा पराभव; 265 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पंजाबकडून यशस्वी पाठलाग
क्रीडा

264 धावा करुनही दिल्लीचा पराभव; 265 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पंजाबकडून यशस्वी पाठलाग

264 धावा करुनही दिल्लीचा पराभव; 265 धावांच्या विक्रमी लक्ष्याचा पंजाबकडून यशस्वी पाठलाग

नवी दिल्ली PBKS Chase Highest Runs : इंडियन प्रीमियर लीगच्या 19व्या हंगामातील 35वा साखळी सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला गेला. पंजाब किंग्सने हा सामना ६ गडी राखून जिंकला. यासह त्यांनी आयपीएल आणि टी-20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावांचा यशस्वी पाठलाग केला आहे.

हेही वाचा :  अरे बापरे! सरावादरम्यान चेहऱ्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी; अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं

दिल्लीनं उभारला धावांचा डोंगर :

सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 20 षटकांत 264 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून केएल राहुल आणि नितीश राणा यांनी उत्कृष्ट कामगिरी केली, त्यांनी दुसऱ्या विकेटसाठी विक्रमी 220 धावांची भागीदारी केली. केएल राहुलनं नाबाद 152 धावा केल्या, तर राणानं 91 धावा केल्या. पंजाब किंग्सकडून अर्शदीप सिंग आणि झेवियर बार्टलेट यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.

पंजाबचा यशस्वी पाठलाग :

लक्ष्याचा पाठलाग करताना, पंजाब किंग्सची सलामीची जोडी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग यांनी धडाकेबाज सुरुवात केली आणि अवघ्या 41 चेंडूंमध्ये पहिल्या विकेटसाठी 126 धावा जोडल्या. प्रियांश आर्यनं 43 धावा केल्या. त्यानंतर प्रभसिमरन सिंगनं 26 चेंडूंमध्ये शानदार 76 धावा करुन तोच वेग कायम ठेवला. सामन्यात एका टप्प्यावर पंजाब किंग्सनं 201 धावांत चार गडी गमावले होते.

सात सामन्यांत सहावा विजय :

कर्णधार श्रेयस अय्यरने शशांक सिंगसोबत पाचव्या विकेटसाठी 64 धावांची भागीदारी रचून सात चेंडू शिल्लक असताना विजय मिळवला. श्रेयस अय्यरनं 36 चेंडूंमध्ये नाबाद 71 धावा केल्या, तर शशांक सिंगनेही नाबाद 19 धावा केल्या. यंदाच्या हंगामात पंजाब किंग्सचा सात सामन्यांमधील हा सहावा विजय आहे, त्यांचा एक सामना पावसामुळं रद्द झाला आहे.

आयपीएल इतिहासातील 5 सर्वोच्च धावांचा पाठलाग :

  • 265/4 – पंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स (2026)
  • 262/2 – पंजाब किंग्स विरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स (2024)
  • 247/2 – सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स (2025)
  • 230/4 – रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विरुद्ध लखनौ सुपरजायंट्स (2025)
  • 224/6 – राजस्थान रॉयल्स विरुद्ध पंजाब किंग्स (2020)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts