Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अरे बापरे! सरावादरम्यान चेहऱ्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी; अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं रुग्णालयात
क्रीडा

अरे बापरे! सरावादरम्यान चेहऱ्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी; अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं रुग्णालयात

अरे बापरे! सरावादरम्यान चेहऱ्याला चेंडू लागल्यानं खेळाडू जखमी; अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं रुग्णालयात

नवी दिल्ली DC vs PBKS Match : आयपीएल 2026 चा 35वा सामना 25 एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स यांच्यात खेळला जाईल. हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जाईल. या सामन्यापूर्वी दिल्लीचा संघ त्यांच्या घरच्या मैदानावर सराव करत होता. दरम्यान, दिल्लीच्या एका गोलंदाजाला गंभीर दुखापत झाल्यानं मैदानावर गोंधळ उडाला. त्या खेळाडूला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हेही वाचा : सुदर्शनची शतकी खेळी व्यर्थ; आरसीबीचा दणक्यात विजय, गुणतालिकेत उलथापालथ

अ‍ॅम्ब्युलन्सनं नेलं रुग्णालयात :

प्रशिक्षण सत्रादरम्यान दिल्ली कॅपिटल्सच्या एका नेट गोलंदाजाला गंभीर दुखापत झाली, ज्यामुळं त्याच्या चेहऱ्यातून रक्त येऊ लागले. खेळाडू गंभीर जखमी झाला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. घटनास्थळी असलेल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला. सध्या, दिल्ली कॅपिटल्सनं खेळाडूच्या प्रकृतीबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. चाहते त्याच्या वैद्यकीय माहितीची वाट पाहत आहेत. असं वृत्त आहे की, बाउन्सर टाकताना खेळाडूला गंभीर दुखापत झाली आणि तो तात्काळ जमिनीवर कोसळला.

 

हा सामना दिल्लीसाठी महत्त्वाचा :

आयपीएल 2026 मध्ये दिल्ली कॅपिटल्सची कामगिरी आतापर्यंत खराब राहिली आहे. संघानं सहा सामने खेळले असून त्यापैकी तीन जिंकले आहेत आणि तीन गमावले आहेत. सध्या दिल्ली सहा गुणांसह गुणतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. दरम्यान, पंजाब किंग्स उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. पंजाबने आतापर्यंत एकही सामना गमावलेला नाही. संघानं पाच सामने जिंकले आहेत, तर एक सामना पावसामुळं रद्द झाला, ज्यामुळं पंजाबला एक गुण मिळाला. पंजाब सध्या 11 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळं, हा सामना दिल्लीसाठी सोपा नसेल. त्यांचा सामना अशा संघाशी आहे, ज्याचे जवळपास सर्व खेळाडू उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहेत.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts