Kendriya Vidyalaya Admission 2026 Process: केंद्रीय विद्यालय प्रवेश प्रक्रिया २० मार्च २०२६ पासून सुरु झाली आहे. किती शाळांसाठी अर्ज करता येऊ शकतो. आणि कोणत्या गोष्टीची विशेष काळजी घ्यावी. चला तर जाणून घेऊया फॉर्म भरण्यापूर्वी कोणत्या गोष्टी लक्षात ठेवावेत.
केंद्रीय विद्यालयांमध्ये (KVS) बालवाडी आणि इयत्ता पहिलीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू झालीय आहे. पालकांना २० मार्च २०२६ पासून ते २ एप्रिल २०२६ पर्यंत अधिकृत वेबसाइटवर अर्ज करता येणार आहे. मात्र, अर्ज करताना काही महत्वाच्या गोष्टींकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. चला तर जाणून घेऊया अर्ज भरताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी.
हेही वाचा: Eid Gifts for Kids: ईडी म्हणून मुलांना द्या हे खास भेटवस्तू, बच्चे कंपनी होतील खुश
अर्ज करण्यापूर्वी या गोष्टी जाणून घ्या?
प्रवेश प्रक्रियेत पात्रता, वयोमर्यादा, कागदपत्रे, आरक्षण आणि शाळांची निवड याबाबत अचूक माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे. चुकीची माहिती अपलोड केल्यास प्रवेश प्रक्रियेत अडचणी येऊ शकतात.
वयोमर्यादा
प्रत्येक वर्गासाठी ठराविक वय निश्चित केलेले आहे:
नर्सरी: ३-४ वर्षे
एलकेजी : ४-५ वर्षे
युकेजी : ५-६ वर्षे
इयत्ता पहिलीसाठी: ६ पूर्ण
आवश्यक कागदपत्रे
जन्म दाखला
पत्ता पुरावा
आधार कार्ड
मागील शैक्षणिक वर्षाचा अहवाल (लागू असल्यास)
ट्रान्सफर सर्टिफिकेट (TC)
उत्पन्न प्रमाणपत्र / EWS प्रमाणपत्र (लागू असल्यास)
APAAR आयडी
पालकांचे सेवा प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शाळा निवडताना काळजी
फॉर्ममध्ये शाळांची निवड करताना जवळच्या शाळांना प्राधान्य द्या. एकदा पर्याय भरल्यानंतर ते बदलता येत नाहीत. सीट वाटप उपलब्धता आणि प्राधान्यक्रमानुसार केले जाते.
आरक्षण नियम
केंद्रीय विद्यालयांमध्ये विविध प्रवर्गांसाठी आरक्षण दिले जाते:
SC – 15%
ST – 7.5%
OBC (NCL) – 27%
CwSN – 3%
अर्ज करताना योग्य प्रवर्ग निवडणे आवश्यक आहे.
फॉर्म भरताना लक्षात ठेवण्याच्या गोष्टी
सर्व माहिती अचूक भरा
नाव, जन्मतारीख आणि स्पेलिंग तपासा
मोबाइल नंबर आणि ईमेल आयडी योग्य द्या (याच माध्यमातून सर्व अपडेट्स मिळतील)
किती शाळांसाठी अर्ज करता येतो?
एका अर्जाद्वारे जास्तीत जास्त 3 केंद्रीय विद्यालये निवडता येतात. त्यापेक्षा अधिक पर्याय ग्राह्य धरले जाणार नाहीत.












