Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • जिथे अमेरिका झुकली तिथे भारताला संधी; घेतला मोठा निर्णय
Top News

जिथे अमेरिका झुकली तिथे भारताला संधी; घेतला मोठा निर्णय

cruide oil

Iran–Israel–US War : इराण-इस्राईल व अमेरिकेच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर आता अमेरिकेने इराणच्या (iran) तेल खरेदीवर असलेले निर्बंध शिथिल केले आहेत. त्यामुळे भारतही इराणकडून तेल विकत (Buying oil) घेणार आहे. जिथे अमेरिका झुकली तिथे भारताला इराणकडून तेल खरेदीवर आयतीच संधी मिळाली आहे.

हे ही वाचा: रुपाली चाकणकर; राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष पदावरही गंडांतर?

भारताचं जवळपास 70 ते 80 टक्के एलपीजी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून

मागच्या काही दिवसापासून जगभरात इंधन टंचाईच्या झळा जाणवत आहेत. त्यात भारतालाही मोठा फटका बसला आहे. परिणामी या इंधन टंचाईला सामोरे कसे जायचे असा प्रश्न भारतासमोर आहे. भारताचं जवळपास 70 ते 80 टक्के एलपीजी या स्ट्रेट ऑफ हॉर्मुझमधून (Strait of Hormuz) येतो. भारताची आतापर्यंत तीन ते चार जहाजं या मार्गावरून निघाली आहेत. 22 जहाजं अजूनही तिथेच अडकून पडली आहेत. जगात ही जी काही तेल टंचाई निर्माण झाली आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (donald trump) यांनी इराणी तेलावरील निर्बंध हटवले आहेत.

भारतीय आणि आशियाई तेल कंपन्या इराणी तेल विकत घेण्यासाठी सरसावल्या

अमेरिकेकडून तात्पुरती सवलत मिळाल्यानंतर आता भारतीय आणि आशियाई तेल कंपन्या हे इराणी तेल विकत घेण्यासाठी सरसावल्या आहेत. भारतातील तीन तेल रिफायनरीजनी इराणी तेल विकत घेणार असल्याचं रॉयटर्सकडे स्पष्ट केलय. पेमेंट कसं करणार त्या बद्दल स्पष्टता नाहीय. इराण आधी रुपयामध्ये आपल्याला तेल विकायचं. पण अमेरिकेच्या दबावानंतर आपण इराणकडून तेल खरेदी खूप कमी केली होती.

भारताकडे दोन महिने पुरेल इतका इंधन साठा

आखाती देशातील युद्धामुळे अनेक देशांना इंधन टंचाईला सामोरे जावे लागत आहे. त्याचा फटका देशातील वाहतूकदारांना बसत आहे. यावर केंद्र सरकारने तात्काळ पावले उचलण्याची गरज निर्माण झालीय. परंतु भारताकडे दोन महिने पुरेल इतका इंधन साठा असल्याचे समोर येत आहे. हा इंधन साठा संपुष्ट झाला तर भारतासमोर मोठे प्रश्न निर्माण होऊ शकतो.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts