• Home
  • देश
  • युद्ध चिघळले; इराणने अमेरिकेच्या हिंद महासागरातील तळांवर क्षेपणास्त्रे डागली
Top News

युद्ध चिघळले; इराणने अमेरिकेच्या हिंद महासागरातील तळांवर क्षेपणास्त्रे डागली

war iran

iran-israiel-america war :  इराण-इस्राईल आणि अमेरिकेचे युद्ध चिघळत आहे. आता हिंद महासागरातील (Indian Ocean)  तळांवर इराणने क्षेपणास्त्रे डागली आहेत. त्यामुळे जगाला आणखी युद्धाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. शनिवारी, इराणने हिंद महासागरातील अमेरिका (america) आणि ब्रिटनच्या (britain)  लष्करी तळ (Military Base) असलेल्या डिएगो गार्सियावर (Diego Garcia)  दोन मध्यम पल्ल्याची बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे (Ballistic Missiles) डागली.

हे ही वाचा: जिथे अमेरिका झुकली तिथे भारताला संधी; घेतला मोठा निर्णय

हवेतच पाडली दोन्ही क्षेपणास्त्रे

दरम्यान, वॉल स्ट्रीट जर्नलने दिलेल्या वृत्तानुसार, इराणने शनिवारी हिंद महासागरातील अमेरिका-ब्रिटनच्या संयुक्त लष्करी तळ असलेल्या डिएगो गार्सियावर दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली. इराणच्या भूभागापासून सुमारे ४,००० किलोमीटर अंतरावर असलेल्या या तळावरील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला आहे. इराणने डागलेली दोन्ही क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याचे अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

माजी केंद्रीय मंत्र्यांकडून चिंता

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या घटनेबद्दल चिंता व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, जर इराणने डिएगो गार्सियावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला असेल, तर त्यामुळे युद्धाची व्याप्ती लक्षणीयरीत्या वाढली आहे. इराणने पश्चिमेला एक स्पष्ट संदेश दिला आहे की ते मध्य-पूर्वेच्या पलीकडे आणि दक्षिणेकडेही हल्ला करू शकतात.

युरोपमधील तळांनाही लक्ष्य करणार

डिएगो गार्सिया तळ हा आशियातील ऑपरेशन्ससाठी अमेरिकेचे प्रमुख केंद्र आहे, जिथे बॉम्बर विमाने तैनात असतात. या घटनेमुळे इराण आता युरोपमधील तळांनाही लक्ष्य करू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महत्त्वाचे मुद्दे:

हल्ल्याचे ठिकाण: हिंदी महासागरातील डिएगो गार्सिया (Diego Garcia) तळ, जो चॅगोस बेटांचा भाग आहे.
हल्ला: इराणने दोन बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे डागली, परंतु ती तळावर पडली नाहीत किंवा निकामी झाली.
प्रतिबंध: एका अमेरिकन युद्धनौकेने दुसऱ्या क्षेपणास्त्रावर इंटरसेप्टर डागला.
परिणाम: या हल्ल्यामुळे युद्ध नवीन क्षेत्रात (हिंदी महासागर) विस्तारले असून जागतिक चिंता वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts