• Home
  • लाईफस्टाईल
  • रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्या; आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे
ताज्या बातम्या

रोज सकाळी उपाशीपोटी कोमट पाणी प्या; आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

warm water

Lukewarm Water Health Benefits | वाईट जीवनशैली आणि चुकीच्या सवयींमुळे अनेक शारिरीक समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे दैनंदिन दिनचर्येत चांगल्या सवयींचा समावेश करणे गरजेचे असते. यामध्ये सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे (Lukewarm Water) ही त्यापैकीच एक चांगली सवय आहे. सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. तसेच जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिलं तर शरीर आतून मजबूत होते आणि आजारांपासून सुटका होते. तर आता आपण दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – “दादांचा एकही शब्द खाली पडू देणार नाही…”, उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवारांची भावनिक प्रतिक्रिया, दिलं मोठं आश्वासन

कोमट पाणी पिण्याचे काय आहेत फायदे?

दररोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील तापमान थोडे वाढते, ज्यामुळे पचनास मदत होते. तसंच कोमट पाणी पिल्यामुळे शरीरातील कॅलरी बर्न होण्यास आणि शरीरातील अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.

रात्रभरात आपल्या तोंडात काही चांगले जिवाणू आणि लाळ जमा होतात. जेव्हा तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिता तेव्हा ही लाळ पोटात जाते आणि ती आम्लाची पातळी संतुलित करते आणि पचनसंस्थेला सक्रिय करते. यामुळे शरीरातील जंतू बाहेर टाकण्यास मदत होते.

कोमट पाणी पिल्यामुळे रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, ज्यामुळे संपूर्ण शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. तसेच, यामुळे स्नायूंचे दुखणे आणि ताण कमी होण्यासही मदत होते.

कोमट पाणी पिल्यामळे त्वचा तेजस्वी होण्यास मदत होते. कोमट पाणी पिल्यामुळे चेहऱ्यावरील मुरूम कमी होतात आणि चेहऱ्यावर ग्लो येण्यास मदत होते. कोमट पाण्यामुळे केसांचे आरोग्यही सुधारते. कोमट पाणी केसांच्या मुळांमधील पेशींना सक्रिय करते, ज्यामुळे केस चमकदार आणि मजबूत होतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts