• Home
  • ताज्या बातम्या
  • परिवहन विभागाचा मोठा निर्णय! ऑटो-टॅक्सी चालकांना मिळणार ‘या’ तारखेपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ
Mumbai

परिवहन विभागाचा मोठा निर्णय! ऑटो-टॅक्सी चालकांना मिळणार ‘या’ तारखेपर्यंत मराठी शिकण्यासाठी मुदतवाढ

mumbai

Marathi language Rule Drivers: ऑटो-टॅक्सी चालकांसाठी आनंदाची बातमी आहे. परिवहन विभागाने एक मोठा निर्णय घेतला आहे. आता मराठी भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ केली आहे.

महाराष्ट्रात ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या संदर्भात नवे निर्देश जाहीर केले आहेत.

हेही वाचा: Gold-Silver प्रेमींसाठी आनंदाची बातमी! लग्नसराईत दर घसरले; आजचे ताजे भाव जाणून घ्या

 भाषा शिकण्यासाठी मुदतवाढ

सरकारच्या निर्णयानुसार, मुंबईसह राज्यातील ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी 1 मे पासून कारवाई होणार असल्याची शक्यता होती, मात्र आता हा कालावधी वाढवण्यात आला आहे.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले की, महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल तर मराठी भाषा येणे आवश्यक आहे. यासाठी विशेष पुस्तिका तयार करण्यात येत असून ती लवकरच प्रकाशित केली जाणार आहे. तसेच इच्छुक चालकांसाठी मराठी शिकवणी वर्गही उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

बैठकीत विविध प्रतिनिधींशी चर्चा

दरम्यान, या बैठकीत विविध प्रतिनिधींशी चर्चा झाली असून परवान्यांबाबत कठोर कारवाई न करण्यावर प्राथमिक सहमती झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे हजारो चालकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे.

ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या अ‍ॅप-आधारित सेवांच्या चालकांनाही मराठी शिकणे आवश्यक असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. यासंदर्भात पुढील मार्गदर्शक सूचना लवकरच जारी होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काही संघटनांनी संप न करण्याचा निर्णय घेतल्याने सध्याच्या घडीला परिस्थिती शांत असल्याचे दिसत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts