• Home
  • राजकारण
  • ’30 मे’ला उपोषण जरांगेंकडून सरकारला नवा अल्टीमेटम आंदोलन पेटणार!
Top News

’30 मे’ला उपोषण जरांगेंकडून सरकारला नवा अल्टीमेटम आंदोलन पेटणार!

jarange patil 1

Manoj Jarange: मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात पुन्हा एकदा आंदोलनाची तीव्र ठिणगी पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला नवा अल्टिमेटम दिला असून, येत्या ३० मे पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा ‘आमरण उपोषण’ सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली आहे.

सरकारकडून मराठा-कुणबी प्रमाणपत्र (Kumbi Certificate) देण्याच्या प्रक्रियेत जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याचा थेट आरोप जरांगेंनी केला आहे. यावेळी आंदोलन अधिक मोठे असेल, असा इशारा त्यांनी देण्यात आला. मराठा आरक्षणाचा (Maratha Arakshan) हा लढा जिथून सुरू झाला होता, तिथेच तो पुन्हा येऊन ठेपला आहे. अंतरवाली सराटीतून सुरु झालेला आंदोलन मुंबईपर्यंत पोहोचला होता. आता पुन्हा हा आंदोलन अंतरवाली सराटीतूनच सुरु होताना दिसत आहे. यापूर्वी याच अंतरवाली सराटीत आंदोलकांवर पोलिसांनी केलेल्या अमानुष लाठीचार्जमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली होती आणि त्या एका घटनेनंतरच हे आंदोलन राज्यभर प्रचंड वेगाने पसरले होते. त्यामुळे जर मनोज जरांगेंनी 30 मेपासून आमरण उपोषण सुरु झाले, तर या आंदोलनाला सरकार कसं हाताळणार, पोलिसांची भूमिका काय राहणार याकडे सर्वांचं लक्ष राहणार आहे..

हेही वाचा: दिव्यांगांसाठी मोठा दिलासा! UDID अटीमुळे थांबलेले अनुदान पुन्हा सुरू होणार, राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय

पत्रकारांशी बोलताना म्हणाले

मनोज जरांगे पाटलांनी पत्रकारांशी बोलताना राज्य सरकार आणि शिंदे समितीवर जोरदार निशाणा साधला. “नवे रेकॉर्ड शोधण्याचे काम शिंदे समितीकडून थांबवण्यात आले आहे. सरकार केवळ वेळकाढूपणा करत असून मराठ्यांची फसवणूक केली जात आहे,” असा आरोप मनोज जरांगेंनी करत सरकारला धारेवर धरलं आहे… “मी मराठा समाजासाठी उपाशी मरेल, पण खोटं बोलून पैसे खाणारा माणूस नाही. समाजाशी गद्दारी मी कधीच करणार नाही, अशी भावनिक साद जरांगेंनी मराठा समाजाला घातली आहे..

प्रमुख मागण्या कोणत्या?

जरांगे पाटील यांनी सरकारसमोर काही ठाम मागण्या ठेवल्या आहेत. 1994 च्या धर्तीवर मराठा समाजाला आरक्षणाचा ‘जीआर’ काढण्यात यावा, अशी मागणी जरांगेंनी केली… तसंच, “सातारा संस्थानचा जीआर अजूनपर्यंत का काढण्यात आला नाही? सरकारने दिलेल्या आंदोलनाच्या तारखेच्या आत म्हणजेच 30 मेपूर्वी सर्व मराठा बांधवांना कुणबी प्रमाणपत्र वाटप करावे. प्रमाणपत्र द्या आणि मराठ्यांची मनं जिंका,” अशी विनंती मनोज जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीस आणि महायुती सरकारला केली आहे…

अंतरवाली सराटी पुन्हा केंद्रस्थानी

जरांगे पाटलांच्या या उपोषणाच्या इशाऱ्यामुळे राज्य सरकार आणि प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून गृह विभागाने हालचाली सुरु केल्याची माहिती आहे. .मनोज जरांगे पुन्हा उपोषणावर बसू नये यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे..कारण मागच्या वेळी याच अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंचे उपोषण सुरु होते.. यावेळी पोलिसांनी लाठीचार्ज केला…. पोलिसांच्या त्या बेदम लाठीचार्जामध्ये 60 पेक्षा जास्त आंदोलक आणि ग्रामस्थ गंभीर जखमी झाले होते, ज्यामध्ये अनेक वृद्ध महिला आणि तरुणांचा समावेश होता.. आंदोलकांच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापती झाल्या होत्या…यामुळे राज्यभर संतापाची लाट उसळली होती..

दुसरीकडे, त्या वेळी झालेल्या गोंधळात आणि दगडफेकीत जवळपास ३७ ते ४० पोलीस कर्मचारी आणि अधिकारीही जखमी झाले होते, ज्यात महिला पोलिसांचाही समावेश होता. तसेच संतप्त जमावाकडून राज्य परिवहन मंडळाच्या (ST) बसेस आणि पोलिसांच्या गाड्यांसह अनेक वाहनं पेटवून देण्यात आली होती….या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि या आंदोलनानं पेट घेतला..जालना जिल्ह्यातील छोटाशा गावातून सुरु झालेलं आंदोलन थेट देशाची आर्थिक राजधानी आणि महाराष्ट्राची राजधानी मुंबईत पोहोचलं..मुंबईत आंदोलन पोहोचल्यानंतर सरकारला नरमाईची भूमिका घेत, जरांगेंच्या आंदोलनावर तोडगा काढवा लागला.

29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या

कुणबी प्रमाणपत्र नसल्याने आमच्या तरुणांचं नुकसान होत आहे..मुलांना नोकरीत संधी मिळत नाहीये..त्यामुळे 29 मे पर्यंत कुणबी प्रमाणपत्र द्या..आता फक्त आश्वासनं नकोत, तर थेट हातात प्रमाणपत्रे हवीत,” अशी आग्रही भूमिका मराठा बांधवांनी घेतली आहे… त्यामुळे 30 मेच्या आत सरकार काही ठोस निर्णय घेणार की महाराष्ट्र पुन्हा एकदा आंदोलनाच्या आगीत होरपळणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत…पहिलेच इंधन तुटवड्यामुळे देशात आणि राज्यात परिस्थिती गंभीर होताना दिसत आहे.

एकाच दिवसात पेट्रोल-डिझेल, दूध, सीएनची यांच्या दरात वाढ झाली आहे…पेट्रोल-डिझेल महागल्याने वस्तूंची वाहतूक महागली आहे..यामुळे भाजीपाल्यांसह इतर सर्वच वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत..यामुळे सर्वासमान्यांच्या खिशाली कात्री बसत आहे..यातच जर पुन्हा आंदोलन सुरु झालं आणि पुन्हा एकदा मुंबई पर्यंत आंदोलन पोहोचलं तर यावेळी सर्वसमान्यांसह सर्वांनाच मोठा फटका बसण्याची शक्यता आहे..कारण मागच्या वेळी मराठा आंदोलकामुळे मुंबई जाम झाली होती आणि मुंबईकरांना मोठा त्रास सहन करावा लागला होता..आताही भाजपच्या आंदोलनावेळी मुंबईकर महिला मंत्री गिरीश महाजन यांच्यावर वाहतूक कोंडीमुळे चांगलीच संतापली होती…त्यामुळे आता मनोज जरांगे पुन्हा आंदोलन करणार का? आंदोलन आंतरवाली सराटीत राहणार की मुंबईपर्यंत पोहोचणार हे पाहणं महत्त्वाचं ठणार आहे..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts