Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • महापौर पाहणीत व्यस्त, अन् मागे पालिका अधिकारी थेट मॅनहोलमध्ये; नेमकं काय घडलं? पाहा
ताज्या बातम्या

महापौर पाहणीत व्यस्त, अन् मागे पालिका अधिकारी थेट मॅनहोलमध्ये; नेमकं काय घडलं? पाहा

Mumbai Rain

Mumbai Rain: मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर महापौरांनी पाहणी दौरा केला. नालेसफाईच्या कामाची माहिती घेत असतानाच एक पालिका अधिकारी थेट मॅनहोलमध्ये पडल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमागचे नेमके कारण काय? जाणून घेऊया.

मुंबईत सुरू असलेल्या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध भागांतील पाणी साचण्याची समस्येची पाहणी करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी दौरा केला. याच पाहणीदरम्यान एक अनपेक्षित घटना घडली आहे. आणि महानगरपालिकेचा एका अधिकारी उघड्या मॅनहोलमध्ये पडला.

हेही वाचा: अणु संशोधन केंद्रात नोकरीची सुवर्णसंधी! JRF पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया

माटुंगा परिसरात जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी सुरू

माटुंगा परिसरात जलनिस्सारण व्यवस्थेची पाहणी सुरू असताना हा प्रकार घडला. घटनास्थळी उपस्थित कर्मचाऱ्यांनाही तत्काळ धाव घेत संबंधित अधिकाऱ्याला बाहेर काढले. सुदैवाने या घटनेत कोणतीही गंभीर दुखापत झाल्याचे वृत्त नाही.

मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने चित्र

दरम्यान, मुंबईत रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने चित्र दिसून आले. अंधेरी, मिलन सबवे, मालाड सबवे, विरा देसाई रोड यांसारख्या भागांमध्ये पाणी तुंबल्याने प्रशासन सतर्क झाले आहे.

महापौर रितू तावडे

या पार्श्वभूमीवर महापौर रितू तावडे यांनी विविध ठिकाणी भेट देत जलनिस्सारण व्यवस्थेचा आढावा घेतला. तसेच पावसामुळे नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी पावसाने स्वागत करत आगामी काही महिने पावसाळा सुरळीत राहावा अशी अपेक्षा व्यक्त केली. तसेच मुंबई महानगरपालिकेचे लोकप्रतिनिधी आणि अधिकारी प्रत्यक्ष मैदानात उतरून परिस्थितीवर लक्ष ठेवत असल्याचे त्यांनी सांगितले.

मात्र, त्याचवेळी त्यांच्या मागे घडलेल्या या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. अधिकाऱ्याला सुरक्षितपणे बाहेर काढल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts