• Home
  • राजकारण
  • शिवतीर्थावर गुप्त बैठक! पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा?
Top News

शिवतीर्थावर गुप्त बैठक! पार्थ पवारांनी घेतली राज ठाकरेंची भेट, नेमकी काय झाली चर्चा?

parth pawar raj thackeray

Parth Pawar Meets Raj Thackeray | राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली आहे. पार्थ पवार हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी दादर येथील शिवतीर्थावर दाखल झाले होते. तर राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा – इराणने हार मानली? होर्मुझ सामुद्रधुनीतून अमेरिकेसाठी तेलाची 20 जहाजं पाठवली? डोनाल्ड ट्रम्प यांचा खळबळजनक दावा

पार्थ पवार आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात खळबळ

मागील काही दिवसांपूर्वीच आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंची शिवतिर्थावर जात भेट घेतली होती. रोहित पवारांनी अजित पवारांच्या अपघातातबाबत चर्चा करण्यासाठी राज ठाकरेंची भेट घेतली होती. यानंतर रोहित पवार आणि राज ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. अजितदादांसारख्या माणसाचा अपघात होतो तरीही सरकार गुन्हा का दाखल करत नाही? असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला होता. तर रोहित पवारांनतर आता पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे.

आज पार्थ पवार हे राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी शिवतिर्थावर दाखल झाले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये गुप्त बैठक पार पडली. राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर पार्थ पवार हे कोणतीही प्रतिक्रिया न देता शिवतीर्थावरून निघून गेले. त्यामुळे राज ठाकरे आणि पार्थ पवार यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाहीये.

पार्थ पवार यांना राज्यसभेसाठी संधी देण्यात आली आहे. 2 एप्रिल रोजी राज्यसभेच्या सात जागा रिक्त होत आहेत. तर त्यातील एका जागेवर पार्थ पवारांना संधी देण्यात आली आहे. त्यानंतर पार्थ पवारांनी राज ठाकरेंची पहिल्यांदाच भेट घेतली आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. त्यामुळे या दोघांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

रोहित पवारांप्रमाणेच पार्थ पवार यांनी देखील अजित पवारांच्या अपघाताप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांनी एक्सवर एक व्हिडीओ देखील शेअर केला होता, ज्यामध्ये VSR कंपनीचा मालक रोहित सिंह हा वैमानिकाच्या सीटवर झोपलेला दिसत होता. यावरून पार्थ पवारांनी प्रवाशांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तसेच त्यांनी रोहित सिंहची चौकशी करण्याची मागणी देखील केली होती. सोबतच राज ठाकरेंनी देखील अजित पवारांच्या अपघाताची चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट महत्त्वाची मानली जात असून या दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts