Rohit Pawar is aggressive : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आत महीना होत आला आहे. गेल्या महिन्यात, 28 जानेवारी रोजी त्यांचं विमान बारामतीजवळ क्रॅश झालं आणि त्यामध्ये अजित दादांसह 5 जणांचा मृत्यू झाला. बारामतीसह अख्खा महाराष्ट्र मन सुन्न झालं होतं. पवार कुटुंबियांचा शोकाकूल चेहरा पाहून तर महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या डोळ्यांत अश्रूच्या धारा वाहताना पाहायला मिळाले. मात्र, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातापाताने घडवला अशी शंका पहिल्या दिवसांपासून व्यक्त करण्यात येत आहे. आज तब्बल २८ दिवस उलटले तरी तपासातील कोणतेही निष्कर्ष समोर आले नाहीत. त्यामुळे दांदाचे लाडके पुतणे, आमदार रोहित पवार यांनी तर हा मुद्दा चांगलाच उचटलून धरला असून ज्या विमानाचा अपघात झाला त्या व्हीएसआर कंपनीसह पायलट यांच्यावरही त्यांनी संशयाचे बोट उठवले. त्यानंतर आता रोहित पवार यांच्यासह युगेंद्र पवार व राजेंद्र पवार यांनी व्हिएसआर कंपनीविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी बारामती पोलिस ठाण्यात ठिय्या मांडला आहे.
हेही वाचा – ईमेल पाठवला तरीही…, अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत धक्कादायक खुलासा, नेमकं घडलं काय?
गेल्या पंधरा दिवसांत रोहित पवार यांनी व्हिएसआर कंपनीच्या विरोधात फक्त आरोपच केले नाहीत तर कागदोपत्री पुरावे सादर केले आहेत. ज्या प्रकार संपूर्ण महाराष्ट्राच्या मनात शंकेचे काहूर माजले आहे त्या सरकारने आतापर्यंत शांत करणे अपेक्षित होते, मात्र गेंड्याची काताडे पांघरलेलं सरकार त्यावर प्रशब्द काढायला तयार नाही. रोहित पवारांनी अनेक मुद्दे उपस्थित करून अपघाताची सविस्तर चौकशी व्हावी, व्हीएस कंपनीचे मालक, काही सत्ताधाऱ्यांशी असलेले संबंध या विषयांवरही त्यांनी अनेक पुरावे मांडून संशय व्यक्त केला आहे.
व्हिएसआर कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास नकार
एवढंच नव्हे तर या प्रकरणात आता रोहित पवार यांनी मोठं पाऊल उचललं असून त्यांनी डीजीसी विरोधातच गुन्हा दाखल करण्याची तयारी केली आहे. काल रोहित पवार व अमोल मिटकरी हे मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस स्टेशन येथे गेले होते. अजित पवार विमान अपघात प्रकरणात व्हिएसआर कंपनीच्याविरोधात तक्रार नोंदवण्यासाठी ते तिथे दोन्ही राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसमवेत पोहोचले. मात्र पोलिसांनी व्हिएसआर कंपनीच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यास नकार दिल्याने रोहित पवारांची बाचाबाची झाली. ते काहीसे आक्रमक झालेले दिसले, फडणवीस यांच्या आखत्यारित असलेलं गृह खातं गुन्हा दाखल करून घेत नाही म्हणल्यावर त्यांचा संताप होणं सहाजिकच होता.
हजारो समर्थक, कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन
रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करणार आहेत. आज सकाळी रोहित पवार, युगेंद्र पवार तसेच अजित पवार यांचे चुलत बंधू, राजेंद्र पवार हे बारामती पोलीस ठाण्याजवळ पोहोचले. तेव्हा त्यांच्यासोबत अजित पवार यांचे हजारो समर्थक, कार्यकर्तेही मोठ्या संख्येने जमले होते. अजित पवारांच्या अपघाताची चौकशी व्हावी, न्याय मिळावा या मागणीसाठी हजारो समर्थक, कार्यकर्त्यांनी पोलिस स्टेशनसमोर आंदोलन केलं. अजित पवार यांची पोस्टर्स घेऊन सर्वांनी पोलिस ठाण्यासमोर अक्षरशः ठिय्या दिला. न्यायासाठी, सत्यासाठी आपण आलो असल्याची भूमिका सर्वांनी मांडली आहे.
गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही
अमर रहे अमर रहे, अजित दादा अमर रहे… रोहित दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, गुन्हा दाखल झाल्याशिवाय हलणार नाही अशा विविध घोषणांनी पोलिस स्टेशनचा परिसर दुमदुमून गेला होता. याप्रकरणी गुन्हा दाखल झालाच पाहिजे, दोषींवर कडक कारवाई झाली पाहिजे. ज्या विमानामुळे अजित दादांचा मृत्यू झाला, त्या विमान कंपनीवर बंदी आलीच पाहिजे, अजित दादांना, आम्हा बारामतीकरांना न्याय मिळालाच पाहिजे अशी मागणी कार्यकर्ते, समर्थक करताना दिसले.












