• Home
  • महाराष्ट्र
  • पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी
Pune

पिंपरी-चिंचवड शहरात सायकल स्पर्धा मार्गावरील सर्व शाळांना सुट्टी जाहीर-जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे आदेश जारी

Pimpri Chinchwad School Holiday

Pimpri Chinchwad School Holiday : आज पुण्यात ग्रँड चॅलेंज टूर-२०२६ आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 19 जानेवारी म्हणजेच आज सकाळी 10 वाजेपासून सायंकाळी 10 वाजेपर्यंत असणार आहे. एवढेच नाही तर हीच स्पर्धा पहिल्या टप्प्याच्या दिवशी पिंपरी-चिंचवड शहरातील स्पर्धा मार्गावर देखील होणार आहे. त्यानुषंगाने 20 जानेवारी म्हणजेच वार मंगळवार रोजी पिंपरी चिंचवड शहरातील सर्व प्रकारच्या खाजगी आणि सरकारी शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डूडी यांनी जारी केले आहेत.

पुणे जिल्हा प्रशासन यासह बजाज तसेच सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने बजाज पुणे ग्रँड टूर-2026 युसीआय मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा 19 ते 23 जानेवारी दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडिया व युनियन सायकलिस्ट इंटरनॅशनल यांनी निर्धारित केलेल्या आंतरराष्ट्रीय मानकानुसार आयोजित करण्यात आली आहे.

हे ही वाचामोठी बातमी! BMC महापौरपदावरुन भाजपाची ठाकरे गटासोबत चर्चा? शिंदेंचं काय होणार?

कसा असणार मार्ग

या स्पर्धेचा पहिला टप्पा 20 जानेवारी रोजी टि. सी.एल सर्कल हिंजवडी फेज-3 येथून सुरु होणार असून ती पुढे- टी.सी.एस सर्कल-मेगापोलीस सर्कल सिंफोनी सोसायटी समोरुन उजवीकडे वळून- बापुजी बुवा मंदिर मार्गे पुणे ग्रामीण हद्दीत जावून परत डोणे फाटा येथून पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत प्रवेश करुन पुढे रोहिदास मारुती सावळे चौक (डोणे फाटा) – डावीकडे वळून आढले बुद्रुक-बेबड ओहळ,- चांदखेड-कासारसाई-नेरे-मारुंजी-लक्ष्मी चौक-भुमकर चौक-अंडरपास मार्गे-डांगे चौक-अंडरपास मार्गे आदित्य बिर्ला हॉस्पिटल समोरुन रिव्हर व्ह्यू चौक वाल्हेकरवाडी-टि जंक्शन डावीकडेवळून छत्रपती शिवाजी महाराज चौक वाल्हेकरवाडी-डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक रावेत उजवीकडे वळून डॉ. डी. वाय पाटील कॉलेज आकुर्डी येथे समाप्त होणार आहे, असेही आदेशात नमूद केले आहे.

40 देशातून 171 सायकलिस्ट होणार सहभागी

या स्पर्धेत जगभरातील 40 देशातून नामांकित 171 सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. त्यानुषंगाने फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, जंगली महाराज रस्ता हे तिन्ही रस्ते वाहतुकीसाठी पूर्णत: बंद करण्यात येणार आहेत. तर सर्व नागरिकांनी पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन पुणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये देखील स्पर्धा मार्गावर वाहतूक बंद करण्यात आली आहे. तर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts