Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुण्यात गॅसचा तुटवडा, मेस चालकाने विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन निवडला अनोखा मार्ग
Pune

पुण्यात गॅसचा तुटवडा, मेस चालकाने विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन निवडला अनोखा मार्ग

Pune gas shortage
85

Pune gas shortage : पुण्यात सध्या एलपीजी गॅसच्या तुटवड्याचा परिणाम अनेक मेस आणि खानावळींवर होत असताना जेम रोड परिसरातील एका गर्ल्स हॉस्टेलने विद्यार्थिनींच्या अडचणी लक्षात घेऊन वेगळाच मार्ग निवडला आहे. जेम रोड येथील स्वामिनी गर्ल्स हॉस्टेलमध्ये सुमारे 300 ते 400 मुली राहतात. गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे अनेक ठिकाणी मेस बंद पडण्याची वेळ आली असताना, येथील मालक विकास पाटील यांनी मुलींच्या जेवणाची अडचण होऊ नये म्हणून अनोखा उपक्रम सुरू केला आहे.

हेही वाचा – LPG vs Induction Cooker: LPG सिलेंडर की इंडक्शन कुकर? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणतं आहे स्वस्त!

एलपीजी सिलेंडरची कमतरता जाणवत असतानाही मेस बंद न करता चुलीवर आणि कोळशाच्या शेगडीवर अन्न शिजवण्याचा पर्याय त्यांनी स्वीकारला आहे. त्यामुळे हॉस्टेलमधील सर्व विद्यार्थिनींना वेळेवर जेवण मिळत असून त्यांच्या अभ्यासावर किंवा दैनंदिन जीवनावर कोणताही परिणाम होऊ दिलेला नाही.

सध्या अनेक विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या मुली पुण्यात राहतात. अशा परिस्थितीत मेस बंद झाल्यास त्यांच्या खाण्यापिण्याची मोठी अडचण निर्माण होऊ शकते. मात्र स्वामिनी गर्ल्स हॉस्टेलने घेतलेल्या या पुढाकारामुळे मुलींना जेवणापासून वंचित राहावे लागलेले नाही.

हॉस्टेल प्रशासनाने परिस्थितीशी जुळवून घेत पारंपरिक पद्धतीने स्वयंपाक करण्याचा मार्ग स्वीकारला असून, त्यामुळे एलपीजी तुटवड्याचा फटका विद्यार्थिनींना बसू दिलेला नाही. विद्यार्थिनींच्या शिक्षणात अडथळा येऊ नये आणि त्यांचे दैनंदिन जीवन सुरळीत सुरू राहावे, हाच या उपक्रमामागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts