Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • LPG vs Induction Cooker: LPG सिलेंडर की इंडक्शन कुकर? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणतं आहे स्वस्त!
Top News

LPG vs Induction Cooker: LPG सिलेंडर की इंडक्शन कुकर? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या स्वयंपाकासाठी कोणतं आहे स्वस्त!

LPG vs Induction Cooke
94

LPG Cylinder vs Electricity for Induction: एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या किमतींमुळे, अनेक घरांमध्ये इंडक्शन कुकर खरेदी करण्याचा विचार करत आहेत. परंतु खरेदी करण्यापूर्वी, स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त आणि अधिक फायदेशीर असेल ते जाणून घ्या

एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे आणि वाढत्या किमतीमुळे अनेक घरांमध्ये इंडक्शन कुकर खरेदी करण्याचा विचार सुरू आहे. परंतु खरेदी करण्यापूर्वी हे जाणून घेणे गरजेचे आहे की, स्वयंपाकासाठी कोणता पर्याय स्वस्त आणि फायदेशीर ठरेल LPG सिलिंडर की इंडक्शन कुकर.

LPG सिलिंडर

सध्या दिल्लीमध्ये LPG सिलिंडरची किंमत सुमारे ९१३ रुपये आहे, देशभरात सरासरी ९५० रुपये धरता येईल. सध्या एक सिलिंडर साधारण महिनाभर टिकतो, आणि ४-५ सदस्यांच्या घरात नाश्ता, जेवण आणि रात्रीचे जेवण पुरतो. LPG गॅसवर स्वयंपाक करताना साधारण वेळ जास्त लागतो, कारण उष्णतेचा काही भाग बाष्प होऊन निघतो.

इंडक्शन कुकर

बाजारात १००० ते २००० वॅटचे इंडक्शन कुकर उपलब्ध आहेत. १०००W पावरवर रोज ४ तास वापरल्यास महिन्याला अंदाजे १२० युनिट वीज खर्च होते. विजेचा दर ८ रुपये प्रति युनिट धरल्यास, महिन्याचा खर्च सुमारे ९६० रुपये येतो. इंडक्शनवर भांडे पटकन गरम होते, त्यामुळे स्वयंपाकाचा वेळ कमी होतो.

लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी

इंडक्शन पूर्णपणे विजेवर अवलंबून आहे.

वीज कमी येत असेल किंवा पावर कट जास्त असल्यास इंडक्शन वापरणे अवघड होऊ शकते.

इंडक्शन उच्च व्होल्टेज वापरतो, त्यामुळे इनव्हर्टरवर सहज चालत नाही

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts