• Home
  • शैक्षणिक बातम्या
  • ‘हा’ नियम पाळला नाही तर सिलिंडर मिळणार नाही; गॅस संकटामुळे सरकार अॅक्शन मोडवर
Top News

‘हा’ नियम पाळला नाही तर सिलिंडर मिळणार नाही; गॅस संकटामुळे सरकार अॅक्शन मोडवर

gas

LPG Gas E-KYC Mandatory | अमेरिका (US), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या देशांमधील तणाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. या देशांमधील युद्ध थांबण्याचं नाव घेत नाहीये. त्यामुळे या युद्धाचा जोरदार फटका भारताला बसला आहे. युद्धाचा परिणाचा थेट ऊर्जा पुरवठ्यावर झाल्यामुळे एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर (LPG Gas Shortage) मोठा ताण आला आहे. भारतात एलपीजी गॅसचे संकट निर्माण झाले. गॅसच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा – Indian Navy Recruitment 2026: इंडियन नेव्हीमध्ये अग्निवीर पदांसाठी भरती जाहीर; जाणून घ्या शैक्षिणक पात्रता अन् निवड प्रक्रिया

देशातील गॅसच्या तुटवड्यामुळे केंद्र सरकारने एलपीजी ग्राहकांसाठी ई-केवायसी (E-KYC) प्रक्रिया अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला ई-केवायसी करणे बंधनकारक आहे. जे ई-केवायसी करणार नाहीत त्यांना गॅस मिळणार नाही अशी माहिती समोर आली आहे.

ई-केवायसी करण्याच्या निर्णयामागे सरकारचा मुख्य उद्देश काय?

आता सर्व एलपीजी ग्राहकांना बायोमेट्रिक आधार प्रमाणीकरणाद्वारे ई-केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे. ई-केवायसी करण्याची ही प्रक्रिया ग्राहकांना घरबसल्या स्मार्टफोनच्या मदतीने पूर्ण करता येणार आहे. तसेच ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे, अशी माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं दिली आहे.

ई-केवायसी केल्यामुळे अधिकृत कनेक्शन आणि गैरवापर रोखण्यास मदत होईल. तसेच गॅस वितरण प्रणाली पारदर्शक होईल. सोबतच भविष्यामध्ये गॅस पुरवठ्याचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करण्यास मदत होईल, असा सरकारच्या या निर्णयामागचा मुख्य उद्देश आहे.

ई-केवायसी करण्यासाठी काय आहे प्रक्रिया?

1. ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सगळ्यात आधी ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये एलपीजी कंपनीचे अधिकृत मोबाईल अॅप डाउनलोड करणे गरजेचे आहे.

2. एचपी गॅस, भारत गॅस किंवा इंडेन यापैकी ज्या कंपनीचा तुमचा गॅस सिलिंडर आहे त्या कंपनीचे अॅप तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि त्यामध्ये तुमची माहिती टाकून तुम्हाला लॉगिन करावं लागेल.

3. यानंतर आधार प्रमाणीकरणासाठी आधार फेस आरडी (Aadhaar FaceRD) हे अॅप देखील तुम्हाला फोनमध्ये डाउनलोड करावे लागेल.

4. Aadhaar FaceRD या अॅपमधील सूचनांनुसार तुम्हाला तुमचा चॅहरा स्कॅन करावा लागेल आणि बायोमेट्रिक पडताळणी पूर्ण केल्यानंतर तुमची ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होते.

दरम्यान, एलपीजी गॅसचा तुटवडा पाहता सरकारने आता ESMA (आणीबाणी कायदा) देखील लागू केला आहे. घरगुती गॅस पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून सरकारने हा कायदा लागू केला आहे. तसेच सरकराने प्रथम प्राधान्य असलेल्या क्षेत्रांना नैसर्गिक वायू पुरवठा वाटप करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता घरगुती आणि आवश्यक क्षेत्र असलेल्यांना गॅसचा पुरेसा पुरवठा होणार असल्याचे निश्चित झाले आहे.

सरकराने आता नैसर्गिक वायू (पुरवठा नियमन) आदेश 2026 जारी केला आहे. यामागचा सरकारचा उद्देश, घरगुती नैसर्गिक वायूचा पुरवठा सुनिश्चित करणे, तसेच प्राधान्य असलेल्या क्षेत्रांना पुरेसे वितरण राखणे हा आहे. तर सरकारने जारी केलेला हा आदेश अधिकृत राजपत्रात प्रकाशित झाल्यानंतर देशात लागू केला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts