Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “रात्र वैऱ्याची आहे… मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची..”; राज ठाकरे असे का म्हणाले?
Top News

“रात्र वैऱ्याची आहे… मराठी माणसांसाठी ही निवडणूक शेवटची..”; राज ठाकरे असे का म्हणाले?

Raj Thackeray Speech

सध्या राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका पार पडत आहेत. या निवडणुका झाल्या की, लगेचच महापालिकेच्या निवडणुका घेण्यात येतील. त्यामुळे सर्व राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे, मतदार यांद्यामध्ये जे काही सुरू आहे, त्यावर लक्ष ठेवा.. मराठी माणसासाठी ही मुंबई महापालिकेची निवडणूक शेवटची असेल. ही निवडणूक जर हातातून गेली तर मराठी माणसाच्या हातातून मुंबई निसटेल,” असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संपूर्ण मतदारांना केले आहे.

दरम्यान विरोधकांकडून सातत्यानं निवडणूक याद्यांमध्ये घोळ असल्याचा दावा करत निवडणूक आयोगावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. आज पुन्हा एकदा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगासह सत्ताध्याऱ्यांवर याच मुद्द्यावरून जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मुंबईमध्ये आयोजित कोकण महोत्सवात बोलत होते. थोडे दिवस थांबा भाषणं सुरूच होतील, 11 वर्ष हा कोकण महोत्सव साजरा होत असल्याची त्यांनी आठवण करून दिली.

हेही वाचा – शिवस्मारक अनावरण प्रकरण! गुन्हाची नोटीस घेयला अमित ठाकरे थेट ठाण्यात, मनसैनिकांची तोबा गर्दी

रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा

मला फक्त जाता जाता एवढीच गोष्ट सांगायची आहे. रात्र वैऱ्याची आहे, गाफील राहू नका, आजूबाजूला लक्ष ठेवा. ज्या प्रकारे राजकारण सुरू आहे. मतदार याद्यांमध्ये जे काही सुरू आहे, त्याकडे लक्ष ठेवा. मतदार खरे आहेत की खोटे आहेत? याच्यावरती पण तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. मराठी माणसासाठी ही येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शेवटची निवडणूक असेल. जर आपण गाफील राहिलो तर महापालिका हातातून गेलीच समजा. त्यामुळे गाफील राहू नका, एवढंच सांगायचं आहे, मुंबई जर आपल्या हातातून गेली तर हे लोक थैमान घालतील, असं यावेळी राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनसे, शिवसेना ठाकरे गट युती

दरम्यान मुंबई महापालिकेमध्ये मनसे आणि शिवसेना ठाकरे गटात युती होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपासंदर्भात देखील दोन्ही पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. मात्र दुसरीकडे काँग्रेसने मनसेसोबत युती करण्यास नकार दिला आहे, त्यामुळे महाविकास आघाडीत मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मात्र मनसेसोबत युती करण्यास सकारात्मक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts