• Home
  • राजकारण
  • राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित
Top News

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त मुलाखतीचा टीझर प्रदर्शित

Raj Thackeray Uddhav Thackeray joint interview

Raj Thackeray Uddhav Thackeray joint interview  :  राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास दोन दशकानंतर एकत्र आले असून आगामी महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-मनसे युती एकत्र लढणार आहे. या दोन्ही ठाकरे बंधुंच्या युतीने राज्यातील समीकरणं प्रचंड बदलणार असून महाराष्ट्रातील नागरिक त्यांच्यावर विश्वास ठेवून मत देतो का हे थोड्याच दिवसांत स्पष्ट होईल. 15 तारखेला राज्यातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. निवडणुका अवघ्या आठवड्याभरावर आलेल्या असतानाच विविध ठिकाणी राज व उद्धव ठाकरे यांच्या सभांचा धडाकाही उडणार आहे. मात्र त्यापूर्वीच राज आणि उद्धव यांची एकत्रित, संयुक्त मुलाखत देखील नागरिकांना पहायला मिळणार आहे.

हेही वाचा – ‘असले ५६ अजित पवार मी खिशात घेऊन फिरतो’ ओवेसी यांच्या अजित पवारांवर हल्लाबोल

संजय राऊत आणि महेश मांजरेकर यांनी दोन्ही ठाकरे बंधूंची ऐतिहासिक मुलाखत घेतली असून त्याचा पहिला टीझरही समोर आला आहे. या मुलाखतीत दोन्ही भावांनी विविध विषयांवर मनमोकळेपणाने उत्तर दिली असून त्यातच राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीकास्त्र चढवल्याचेही पहायला मिळाले. महाराष्ट्रातील तमाम प्रेक्षकांना 8 आणि 9 जानेवारी रोजी ही महामुलाखत पाहता येणार आहे.

राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नव्हे – उद्धव ठाकरे 

मनसे अध्यक्ष राजठाकरे यांनी या संयुक्त मुलाखतीमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. भ्रष्टाचाराच्या गोष्टी फडणवीसांनी करूच नयेत असं राज ठाकरे म्हणाले. तर राज्यकर्त्याचं प्रेम हे राज्यावर असलं पाहिजे, सत्तेवर नव्हे असं उद्धव ठाकरे यांनी नमूद केलं.

घरातून बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते – महेश मांजरेकर 

याच मुलाखतीत ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनही राज व उद्धव यांच्याशी संवाद साधत त्यांना काही प्रश्न विचारले. एक मुंबईकर म्हणून आज मी जेव्हा घरातून बाहेर पडतो ना, खरं सांगू तर मला लाज वाटते असं मांजरेकर म्हणाले. बाहेर पडलो तर जिथे जायला मला 10 मिनिटं लागत होत, तिथे आता 1 तास लागतो, असं म्हणत मांजरेकर दुरावस्थेबद्दल थेट बोलले.

पुणं लवकरात लवकर बरबाद होईल – राज ठाकरे 

या मुलाखतीत राज व उद्धव यांचा आक्रमक अंदाज पहायला मिळाला. मुंबई खराब व्हायला एक काळ लोटला, पुणं ते बघणार नाही. पुणं लवकरात लवकर बरबाद होईल असं राज ठाकरे म्हणाले. काही गोष्टींकडे राज्यकीय पक्ष म्हणून न बघता राज्य म्हणून पाहणं गरजेचं आहे, असं मला वाटंत, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts