Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • पैसे वाटपाच्या मुद्द्यावर मी 2 डिसेंबर नंतर बोलेले, मला युती टिकवायची आहे – रवींद्र चव्हाण
Top News

पैसे वाटपाच्या मुद्द्यावर मी 2 डिसेंबर नंतर बोलेले, मला युती टिकवायची आहे – रवींद्र चव्हाण

Ravindra Chavan on one side and Maharashtra Chief Minister Eknath Shinde on the other side during a political alegation

Ravindra Chavan fund distribution issue : गेल्या काही दिवसांपासून महायुती सरकारमध्ये वातावरण बिघडल्याचे दिसत आहे. नाराज असलेले उपमुख्यमंत्री दिल्लीला गेल्याचा दावा करण्यात येत होता. यासह काही ठिकाणी भाजप आणि शिंदे गटात वादविवाद देखील काही दिवसांपासून पहायलया मिळत आहे. अशातच आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेले वक्तव्य चर्चेत आले आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे आणि भाजप यांच्यामध्ये वादविवाद सुरू आहे. भाजप कार्यकर्त्याच्या घरावर धाड घालत पैसे वाटप होत असल्याचा आरोप निलेश राणे यांनी केला आहे. तर मराठवाड्यात शिंदे गटातील आमदार संजय बांगर यांच्या घरी पहाटेच्या सुमारास पोलिसांनी छापा घातल्याचा दावा करण्यात अल आहे. अशातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ठिणगी पेटवणारे वक्तव्य करत राजकीय वातावरण पेटवल्याचे दिसून येत आहे.

हे ही वाचा : सर्वात मोठी बातमी! ऐन मतदानाच्या तोंडावर आयोगाने दिली ‘या’ ठिकाणच्या निवडणुकींना स्थगिती

आता काही दिवसांवर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका तोंडावर आल्या आहे. अशातच आता शिंदे गटात आणि भाजपात तेढ निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे. मला दोन तारखेपर्यंत युती टिकवायची असून सुरू असलेलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांवर मी नंतर बोलेल. असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यावरून आता नीलेश राणे यांनी लगावलेल्या आरोपांची पोलखोल होणार पण 2 डिसेंबर नंतर आशा चर्चाना उधाण आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे चाळीसगाव येथे प्रचारासाठी आले होते. तेव्हा त्यांनी यावर भाष्य केले. शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी मालवणमध्ये स्टिंग ऑपरेशन केले असून त्यांनी पैसे वाटप होत असल्याचा आरोप लगावला होता. या आरोपांवर रवींद्र चव्हाण यांनी सूचक इशारा देत मला 2 डिसेंबरपर्यंत युती टिकवायची असल्याचे वक्तव्य केले. पुढे ते म्हणाले की, मी निलेश राणे यांच्या आरोपांवर उत्तर देईल. सध्या मी काहीही बोलणार नाही.निलेश राणे खोटं बोलत आहेत असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. तर चव्हाण यांच्यामुळे महायुतीत विघ्न येत असल्याचा आरोप शिंदे गटाने केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts