Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • “.. लव्ह मॅरेज.. ?” अजित पवारांचा नगराध्यक्ष उमेदवाराला मिश्किल सवाल
Top News

“.. लव्ह मॅरेज.. ?” अजित पवारांचा नगराध्यक्ष उमेदवाराला मिश्किल सवाल

ajit pawar in manchar

Ajit Pawar love marriage question : आज पुण्यातील मंचर येथे राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे एकाच ठिकाणी समोर येणार आहे. मंचर नगरपंचायत येथून निवडून येण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मंचर येथे सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेदरम्यान आज पुन्हा ते चर्चेत आले आहे.

मंचर येथे सुरू असलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी थेट महिला उमेदवाराला लव्ह मॅरेज झालंय का? असा सवाल केला आहे. यावर त्यांनी हा प्रश्न का विचारला यावर देखील स्पष्टीकरण दिले आहे. मंचर येथील नगरपंचयतीच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार
मोनिका बाणखेले यांन हा सवाल विचारण्यात आला असून सासर आणि माहेर एकाच गावात असल्याने विचारण्यात आल्याचे स्पष्टीकरणही अजित पवारांनी दिले आहे.

पुण्यातील मंचर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मोनिका बाणखेले लग्नापूर्वीच्या मोनिका बेंड, तुमचा उमेदवार फार फायदेशीर आहे, कारण मोनिकाताईंचं माहेर पण इथेच आहे आणि सासरपण हेच आहे, बरोबर ना? मग लव्ह मॅरेज आहे की काय? असा सवाल अजित पवार यांनी मंचावर विचारला. हा प्रश्न विचारल्यास उपस्थितांमध्ये हशा पिकला. त्यावर पुढे ते म्हणाले, सासर माहेर जवळ असले की जरा शंकेला जागा उरते, पण हरकत नाही, वाईट वाटून घ्यायचं कारण नाही. अजित पवार कोणत्या न कोणत्या कारणाने कारणाने असतात. आता ते नव्या वक्तव्याने चर्चेत आले आहे.

 

135 कोटींचा निधी मंजूर करायला किती वेळ लागणार

मंचर येथे पाण्यासाठी 135 कोटींचा निधी मंजूर करायला किती वेळ लागणार आहे असा सवाल त्यांनी सभेत उपस्थित केला. अरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठरवलं की 136 तर 136 कोटी निधी मंजूर करायला किती वेळ लागणार ?
आता बातमी होईल की मी प्रलोभन दाखवलं असेही वक्तव्य त्यांनी केले.

एकनाथ शिंदेचे नाव टाळले

मंचरचा विकास कोण करु शकतं? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, माजी खासदार शिवाजी आढळराव, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद करु शकतात, परंतु या वक्तव्यावेळी त्यांनी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव घेणे टाळले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts