Breaking News :
  • Home
  • बिजनेस
  • आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 639 तर निफ्टी 195 अंकांनी वधारला
ताज्या बातम्या

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 639 तर निफ्टी 195 अंकांनी वधारला

आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात तेजी; सेन्सेक्स 639 तर निफ्टी 195 अंकांनी वधारला

Today Stock Market : आठवड्याच्या पहिल्या दिवशी आज देशांतर्गत शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. अमेरिका आणि इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बीएसई सेन्सेक्स 639.42 अंकांच्या वाढीसह 77,303.63 अंकांवर बंद झाला. तर NSE चा निफ्टी 50 निर्देशांक देखील आज 194.75 अंकांनी वाढून 24,092.70 अंकांवर बंद झाला. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यातील शेवटच्या तीन सत्रांमध्ये बाजारात मोठी घसरण नोंदवण्यात आली होती.

हेही वाचा : पोपटांनी खाल्ली शेतकऱ्याची डाळिंबं अन् सरकार देणार नुकसान भरपाई; 10

कोणत्या शेअर्समध्ये वाढ :

आज सेन्सेक्समधील 30 पैकी 23 कंपन्यांचे समभाग वाढीसह हिरव्या रंगात बंद झाले तर उर्वरित 7 कंपन्यांचे समभाग घसरणीसह लाल रंगात बंद झाले. दुसरीकडे, निफ्टी 50 मधील 50 कंपन्यांपैकी 39 कंपन्यांचे समभाग वाढीसह बंद झाले आणि उर्वरित सर्व 11 कंपन्यांचे समभाग घसरणीसह बंद झाले. सेन्सेक्स कंपन्यांमध्ये समावेश असलेल्या सन फार्माचा समभाग आज सर्वाधिक 7.03 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाला.

या शेअर्समध्येही झाली वाढ :

सोमवारी उर्वरित सेन्सेक्स समभागांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग 3.19 टक्के, अदानी पोर्ट्स 2.60 टक्के, एनटीपीसी 2.56 टक्के, टेक महिंद्रा 2.46 टक्के, टीसीएस 2.23 टक्के, एचसीएल टेक 2.22 टक्के, महिंद्रा अँड महिंद्रा 2.20 टक्के, महिंद्रा बँक 2.20 टक्के, कोटा इन्डस्ट्रीज 2.20 टक्के, टाटा स्टील 1.52 टक्के, पॉवरग्रिड 1.49 टक्के, मारुती सुझुकी 1.31 टक्के, एलअँडटी 1.05 टक्के, इंडिगो 0.94 टक्के, टायटन 0.92 टक्के, एसबीआय 0.86 टक्के, आयटीसी 0.80 टक्के, एचडीएफसी बँक 0.68 टक्के वाढीसह बंद झाले.

या कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह बंद :

दुसरीकडे, आज बीईएलचे शेअर्स 1.80 टक्के, ट्रेंट 1.08 टक्के, आयसीआयसीआय बँक 0.70 टक्के, इटर्नल 0.64 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 0.15 टक्के आणि बजाज फिनसर्व्ह 0.02 टक्क्यांनी घसरुन बंद झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts