Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 852 अंकांनी कोसळला, निफ्टीही 24,173 अंकांवर बंद
ताज्या बातम्या

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 852 अंकांनी कोसळला, निफ्टीही 24,173 अंकांवर बंद

शेअर बाजारात भूकंप! सेन्सेक्स 852 अंकांनी कोसळला, निफ्टीही 24,173 अंकांवर बंद

share market closing : जागतिक संकेत आणि मोठ्या प्रमाणात झालेल्या विक्रीमुळं गुरुवारी देशांतर्गत शेअर बाजार मोठ्या घसरणीसह बंद झाला. बीएसई सेन्सेक्स 852.49 अंकांच्या लक्षणीय घसरणीसह 77,664.00वर बंद झाला. एनएसई निफ्टीमध्येही 205.05 अंकांची मोठी घसरण होऊन तो 24,173.05 वर स्थिरावला. आज निफ्टीमधील सर्वाधिक घसरण झालेल्या कंपन्यांमध्ये ट्रेंट, एम अँड एम, श्रीराम फायनान्स, एसबीआय लाईफ इन्शुरन्स आणि टेक महिंद्रा यांचा समावेश होता. तर डॉ. रेड्डीज लॅब्स, सिप्ला, जिओ फायनान्शियल, अदानी एंटरप्रायझेस आणि अपोलो हॉस्पिटल्स या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली.

हेही वाचा : बारामतीचा कारभारी जय पवार? २०२९ ची निवडणूक लढण्याचे स्पष्ट संकेत

शेअर्सवर क्षेत्रांचा काय परिणाम झाला? :

क्षेत्रनिहाय विचार केल्यास, कॅपिटल गुड्स क्षेत्रात 0.4% वाढ झाली, तर हेल्थकेअर निर्देशांकात 1.6% वाढ झाली. ऊर्जा निर्देशांकात 0.25% वाढ झाली आणि मीडिया निर्देशांकात 0.9% ची वाढ नोंदवली गेली. दुसरीकडे, ऑटो, ग्राहक टिकाऊ वस्तू आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँक क्षेत्रात प्रत्येकी 2% ची घसरण झाली, तर आयटी, रिअल्टी, मेटल आणि खाजगी बँक क्षेत्र सुमारे 1% नं कमजोर झाले.

रुपया 33 पैशांनी 94च्या पातळीखाली घसरला :

आज चलन बाजारात भारतीय रुपया प्रति अमेरिकन डॉलर 94 च्या खाली घसरला. तो 33 पैशांच्या घसरणीसह बंद झाला. रुपयाची घसरण सलग चौथ्या सत्रात सुरु राहिली आणि 33 पैशांनी घसरून तो 94.11 (तात्पुरता) वर बंद झाला. गुरुवारी, वाढत्या कच्च्या तेलाच्या किमती आणि पश्चिम आशियातील शांतता चर्चेच्या अनिश्चित टप्प्यामुळं रुपयानं एका महिन्यात दुसऱ्यांदा 94 ची पातळी ओलांडली होती. परकीय चलन व्यापाऱ्यांनी सांगितले की, देशांतर्गत शेअर बाजारातील मोठी विक्री आणि परकीय निधीचा सततचा बहिर्वाह, तसेच अमेरिकन चलनासाठी वाढलेली जागतिक मागणी, यांमुळे देशांतर्गत चलनावर आणखी दबाव आला, जे एका आठवड्यात १ टक्क्यांहून अधिक घसरलं आहे.

आंतरबँक परकीय चलन बाजारात, रुपया 94.03 वर उघडला आणि दिवसभरातील व्यवहारादरम्यान अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 94.17 च्या नीचांकी पातळीवर घसरला. दिवसभरातील 93.98 च्या उच्चांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर, तो अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 94.11 (तात्पुरता) वर बंद झाला, जो मागील बंद भावापेक्षा 33 पैशांनी कमी होता. बुधवारी, रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत 34 पैशांनी घसरुन 93.78 वर बंद झाला, सलग तिसऱ्या दिवशी घसरण नोंदवली गेली. गेल्या चार सत्रांमध्ये, 17 एप्रिल रोजी नोंदवलेल्या 92.91 च्या उच्चांकी पातळीपासून देशांतर्गत चलनात 120 पैशांची, म्हणजेच सुमारे 1.3 टक्क्यांची घसरण झाली आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts