Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा गेम? ठाकरे सेने फुटणार? शिंदेचा प्लान तयार!
Top News

शिवसेनेच्या वर्धापन दिनी मोठा गेम? ठाकरे सेने फुटणार? शिंदेचा प्लान तयार!

Shiv Sena Foundation Day Political Game
44

Shiv Sena Foundation Day Political Game : मागील काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गट फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामधील काही खासदार शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्यार आहेत अशा चर्चा रंगत आहेत. त्यातच ठाकरे गटाच्या खासदारांची मातोश्री येते नुकतीच बैठक पार पडली. मात्र, या बैठकीला केवळ चार खासदार उपस्थित होते. त्यामुळे या चर्चांना आणखीन बळ मिळाले आहे. काही दिवसांवर शिवसेनेचा वर्धापन दिन आला आहे. त्यावेळी एकनाथ शिंदे मोठा धमका करण्याच्या तयारीत असल्याचे सांगितले जात आहे.

त्या पाश्वभूमीवर ठाकरे गटाने देखील मोठं पाऊल उचललं असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांता राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिंदे गटाकडून ऑपरेशन टायगर नेमकं कधी होणार याची काही निश्चित तारीख समोर आली नसली तरीही सध्या होणाऱ्या घडामोडींमुळे ठाकरे सेनेत मोठी धाकधूक वाढली आहेत. बैठकीला ९ खासदारांपैकी केवळ ४ खासदार उपस्थित होते, त्यामुळे उर्वरित ५ खासदार ठाकरे गटाची साथ कोणत्याही क्षणी सोडू शकतील, अशी परिस्थित सध्या निर्माण झाली आहे.

शिवसेनेला ६० वर्ष पूर्ण

दरम्यान, शिवसेनेचा १९ जून रोजी वर्धापन दिन आहे. शिवसेनेला ६० वर्ष पूर्ण होत असून हे वर्ष हिरक महोत्सव म्हणून साजरी केलं जाईल. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे दोन्ही गट सध्या जय्यत तयारी करत आहेत. त्याचवेळी शिंदे गटाकडून मोठी खेळी खेळली जाणार असल्याच्या सांगण्यात येत आहे. वर्धापन दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांच्याकडून मोठं शक्तीप्रदर्शनाची जय्यत तयारी सुरू आहे. शिंदे गटाचा हा वर्धापन सोहळा गोरेगाव येथी नेस्को सेंटरमध्ये पार पडणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गटातील आमदार, नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची दोन दिवसांपुर्वीच शिंदे गटाची मोठी बैठक पार पडली. या बैठकीत सर्व आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर विशेष जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत.

ऑपरेशन टायगर विषयी राजकीय वर्तुळात चर्चा

यंदाच्या वर्धापन दिनी जिल्हा परिषद, विधान परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांचा एकत्रित सत्कार समारंभ पार पडणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र, असं असलं तरी सध्या सगळ्यांचं लक्ष लागलं आहे ते ‘ऑपरेशन टायगर’कडे, राजकीय वर्तुळातही याबद्दलच सर्वाधिक चर्चा रंगली आहे. वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या दिवशीच ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटात प्रवेश करणार का, याच दिवशी शिंदे गट ठाकरे गटाल धक्का देत गेम करणार का, अशा चर्चाना, अनेक तर्क-वितर्काना उधाण आलं असून, सर्वांचं लक्ष तिथेच एकवटलं आहे.

ठाकरे गटाचा षण्मुखानंद सभागृहात सोहळा

एकीकडे शिंदे गटाकडून वर्धापन दिनानिमित्त शक्तीप्रदर्शन करण्यात येणार असतानाच, दुसरीकडे, उद्धव ठाकरे यांचा गटही 60 व्या वर्धापन दिनासाठी सज्ज आहे. शिवसेनेचा हा हिरक महोत्सवी वर्धापन दिन, शुक्रवार 19 जून रोजी मुंबईत मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे. खासदारांच्या संभाव्य फुटीच्या चर्चावर आणि सध्याच्या राजकीय घडामोडींवर उद्धव ठाकरे काय भूमिका मांडतात, ते काय बोलतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच ठाकरे गटाचे सर्व नऊ खासदार या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का, याचीही उत्सुकता राजकीय वर्तुळात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts