• Home
  • राजकारण
  • “मतदान प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता नाही;” खासदार सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त
Top News

“मतदान प्रक्रियेत पारदर्शकता व विश्वासार्हता नाही;” खासदार सुप्रिया सुळेंकडून खेद व्यक्त

Supriya Sule on voting process transparency

Supriya Sule on voting process transparency : आज राज्यातील २९ महापालिकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून दर दोन तासांनी मतदानाची आकडेवारी समोर येत आहे. मात्र, त्याचबरोबर काही ठिकाणी दुबार मतदान, मतदान यंत्रात तांत्रिक, दोन गटांतील भांडण वार अनेक राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. या घटनेवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. ‘सशक्त लोकशाहीसाठी मतदान प्रक्रिया पारदर्शक व विश्वासार्ह असणे आवश्य आहे, मात्र सध्या तसे होताना दिसत नाही, हे खेदाने नमूद करावे लागतंय,’ अशी एक्स या सोशल मिडियावर सुळे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

हेही वाचा – शाई पुसून गैरकृत्य करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई; निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण

आज राज्यातील महानगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना माध्यमांमधून येणाऱ्या बातम्या अतिशय धक्कादायक व चिंताजनक आहेत. मतदान केंद्रांवर ईव्हीएम बाबत गंभीर घोळ समोर येत आहेत. अनेक ठिकाणी मतदान केल्यानंतर कोणाला मत गेलं याचा लाईट लागत नाही. सर्व मते दिल्यानंतर ‘बीप’ आवाज येत नाही.

अनेक ठिकाणी तर मतदानानंतर बोटावरील शाई पुसण्यासाठी लोक उभे केले जात आहेत. हे बोगस मतदानासाठी तर नाही ना, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत असल्याची शंका खासदार सुळे यांच्याकडून व्यक्त करण्यात आलीय.

मतदान केंद्रांच्या बाहेर उघडपणे पैशांचे वाटप

मतदान केंद्रे व अनुक्रमांक यामध्ये अद्यापही घोळ आहेत. काही ईव्हीएम वर उमेदवारांची नावे चुकल्याची आढळून आलं आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर उघडपणे पैशांचे वाटप होत असल्याच्या घटनाही समोर येत आहेत. या सर्व गंभीर प्रकारांमुळे गोंधळ व चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून ही संपूर्ण प्रक्रियाच संशयाच्या भोवर्‍यात अडकली आहे, असल्याचे चिंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली आहे.

दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच हातभार लावला – रोहित पवार

मतदानानंतर बोटाला लावलेली शाई अनेक दिवस तशीच राहत असल्याचं आतापर्यंतच्या अनेक निवडणुकींमध्ये बघितलंय… पण आज ही लावण्यात आलेली शाई लगेचच पुसली जात असून अशा प्रकारची शाई वापरणं म्हणजे दुबार आणि बोगस मतदानासाठी निवडणूक आयोगानेच लावलेला हा हातभार नाही का? की बोगस मतदानाच्या माध्यमातून जिंकण्यासाठी महाशक्तीच्या दबावातून अशी शाई वापरण्यात आली की या शाईमध्येही भ्रष्टाचार झाला? याचा खुलासा निवडणूक आयोगाने करावा. तसचं अनेक ठिकाणी दुबार मतदार असूनही तिथं डबल स्टार दिसत नाही, याचा अर्थ काय?, असा गंभीर प्रश्न आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts