Breaking News :
Top News

T20 WC Super 8 : इंग्लंडने उडवला श्रीलंकेचा 51 धावांनी धुरळा

England defeated Sri Lanka
87

T20 WC Super 8 : टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीतील गट 2 मध्ये श्रीलंका आणि इंग्लंड हे संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात नाणेफेकीचा कौल हा श्रीलंकेच्या बाजूने लागला आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 9 गडी गमावले आणि 146 धावांची खेळी केली. तसेच श्रीलंकेसमोर 147 धावांचं आव्हान ठेवलं. श्रीलंकेचा संघ सर्व गडी बाद 95 धावा करू शकला. इंग्लंडने हा सामना 51 धावांनी जिंकला. यासह इंग्लंडने उपांत्य फेरीच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.

श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेतील सुपर 8 फेरीत विजयी धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव पत्त्यासारखा कोसळला. आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले. पावरप्लेच्या 6 षटकात श्रीलंकेने अवघ्या 34 धावांवर 5 विकेट गमावले होते. त्यामुळे इंग्लंडने या सामन्यावर मजबूत पकड मिळवली होती. प्रत्येक विकेटनंतर श्रीलंकेवर दबाव वाढत गेला. पाथुम निस्संका 9, कामिल मिशारा 6, कुसल मेंडिस 4, पवन रत्ननायके 0, दुनिथ वेल्लागे 10, दुशन हेमंथा 5 आणि कामिंदु मेंडिस 13 धावा करून बाद झाले. कर्णधार दासुन शनाकाने झुंज देण्याचा प्रयत्न केला. त्याने 24 चेंडूत 30 धावा केल्या. यात 2 षटकार आणि एक चौकार मारला. विल जॅक्सने श्रीलंकेला मोठा धक्का दिला. त्याने 4 षटकात 22 धावा देत 3 गडी बाद केले.

इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने एकाकी झुंज

इंग्लंडकडून फिलिप सॉल्टने एकाकी झुंज दिली. त्याने 40 चेंडूत 6 चौकार आणि 2 षटकार मारत 62 धावांची खेळी केली. या व्यतिरिक्त एकही फलंदाज साजेशी कामगिरी करू शकलं नाही. एकाही फलंदाजाला 25 धावांचा आकडा गाठता आला नाही. विल जॅक्सने 21 धावांची खेळी केली. इंग्लंडला पहिला धक्का जोस बटलरच्या रुपाने बसला. संघाच्या 14 धावा असताना जोस बटलर 7 धावा करून तंबूत परतला. त्यानंतर धडाधड विकेट पडत गेल्या. जेकब बेथेलने 3, टॉम बँटनने 6, हॅरी ब्रूकने 14, सॅम करनने 11. लियाम डावसन 6 धावा करून तंबूत परतले. जेमी ओव्हरटन नाबाद 10 आणि अदिल राशीद नाबाद 1 धावांवर राहिले. जोफ्रा आर्चरला तर खातंही खोलता आलं नाही. दिलशान मदुशंका 2, डुनिथ वेलागेने 3, महेश थीक्षाना 2, दुष्मंथ चामीराने 1 विकेट काढली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts